पान:वामनपंडित.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. सिद्ध करितां येते. पहिला मुख्य आक्षेप हा की, जर पंडित हे खरोखरच रामदासांचे शिष्य झालेले असते व त्यांच्या ब्रह्मविद्येच्या उपदेशानेच त्यांच्या मनाला स्वास्थ्य आलेले असते, तर सच्चिदानंदयतिवेषाने येऊन भगवंताने आपल्याला हे रहस्य विशद करून सांगितले, असें पंडित खोटेंच लिहिते काय ? मागे लिहिण्यांत आलेच आहे की, ही गोष्ट पंडितांनी पांच सहा वेळ सांगितली आहे, परंतु समर्थांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नामनिर्देश त्यांनी कोणत्याही ग्रंथांत एकदाही केला नाही. हनुमंतस्वामींनी दिलेल्या वरील गोष्टींतील प्रत्येक मुद्यावर पुष्कळ शंका येतात. पहिल्या मुद्यांत ब्रह्मराक्षसाची अद्भुत गोष्ट आहे, तिला फारसे महत्व देता येत नाही. फार तर पंडितांना काहीतरी कारणाने एकाएकी उपरति होऊन असमाधान उत्पन्न झाले व कोणी तरी सत्यज्ञान करून देणारा गुरु गांठला पाहिजे, असें त्यांस वाटुं लागले, इतकेंच त्यांतून निष्पन होऊ शकेल; आणि हेच त्यांतील खरें सार आहे. कारण ही गोष्ट पंडितांनी अनुभूतिलेशग्रंथांत दिलेल्या त्यांच्या स्वतःच्या हकीकतीशी जुळती आहे आपल्या मनाला असमाधान उत्पन्न होऊन आत्मोपदेशासाठी आपण अनेक गुरु पाहिले व संस्कृत आणि प्राकृत असे विविध ग्रंथ वाचिले, असें पंडित सांगतात

  • आचार्यत्वाय बहवः सेविता भूतले मया । आत्मोपदेशसमये गुरुत्वेन न मानिताः॥१३६ एवं संस्कृतशास्त्रज्ञाः प्राकृतग्रंथवित्तमाः।

बहवः सेवितास्तत्त्वमद्वैतं ते वदन्विति ॥ १४० या श्लोकांचे साम्राज्यवामनकृत मराठी भाषांतरःगुरुत्वाकारणें म्यां या भूतळी बहु सेविले । आत्मोपदेशसमयीं आचार्यत्वे न मानिले ॥१३६ ॥ एवं संस्कृतशास्त्रज्ञ प्राकृतग्रंथवित्तम । अद्वैततत्त्व बोलाया सेविले म्यां बहुत ते ॥१४० ॥ वर्षशताचिया पूर्वी प्राकृतग्रंथकार जे । त्यक्तदेही जे यथोक्त न तैसे ज्ञानि प्रस्तुतीं ॥ १४२ ॥ होतां निराश, ज्ञानातें नच भूतलिं जाणता । सगमी सित असित सिद्धान्त तनु त्यागणें ॥१४३ ॥