पान:वामनपंडित.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ श्रीसरस्वतीमंदिर. वाद कांहीं मिटेना. तेव्हां समर्थानी मारुतिरूप धारण केले व भु:भुःकार करून व शेपटाचा तडाखा देऊन पंडितांना दर्डावून विचारिले “वामना ! समस्या पूर्ण झाली की नाही ? " वामनाने गांगरून 'हो' म्हणून सांगितले. तेव्हां पूर्वीचे सौम्य रामदासी रूप धरून समर्थांनी पुन्हा तोच प्रश्न केला, तेव्हां पंडितांनी 'नाही' हा सरळ जबाब दिला. अखेर समर्थीनीं पंडितांची उंटाची उंट पुस्तकें, भाराभर जयपत्रे आणि अकटोविकट ग्रंथावलोकन या संबंधे मर्मभेदक उद्गार काढून, “बृहदारण्यांत चौदा ब्रह्मांची स्थापना करून उठविण्याचा प्रकारही आहे तो पहा,' म्हणून सांगितले. तेव्हां पंडितांचे समाधान झाले. नंतर समर्थांनी पंडिता: ना प्राकृत रचना करण्याचा उपदेश केला व पंडितांनीही संस्कृतांत सम ची मनसोक्त स्तुति केली; ती हनुमंतस्वामींनी दिली आहे. पुढे पंडितांनी यथार्थदीपिकादि बारा लक्ष ग्रंथ लिहिला व त्यांतील सुंदर यमकें पाहून समर्थांनी त्यांस ' यमक्या वामन' हे नांव ठेविलें. ( ४ ) अवधत मूतींचे दर्शन घेऊन पंडित समर्थाकडे येत असतांना वाटेंतएकदा स्वयंपाक करीत होते. त्यांची स्त्री गिराबाई बरोबर होती, परंतु ते मध्वसंप्रदायी वैष्णव असल्यामुळे तिच्या हातचे जेवीत नसत. चुलीवर भांडे ठेविले असतांना, पंडित सच्चिदानंदपदाचा विचार करण्यांत इतके गढून गेले की, चुलीवरून भांडे दळले हे त्यांच्या लक्ष्यांत आले नाही. तेव्हां गिराबाईला हसू आले. त्यावर ' हंसलीस कां ? ' ह्मणून पंडितांनी विचारिलें. तेव्हां गिराबाई म्हणाली, “ तीन वेदांचा अद्याप विचार करीत आहां म्हणून हंसलें." हे ऐकतांच पंडितांनी तिला आलिंगन दिले व म्हणाले, । तूं माझी पत्नी आहेस म्हणून वंदन करीत नाही. नाहीतर वंदनच केले असतें.' नंतर तिच्या सूचनेवरून अवधूताज्ञेप्रमाणे पंडित लवकरच समथीकडे उपदेशास्तव आले. त्या वेळेपासून पंडित स्वस्त्रीच्या हातचे जेवू लागले. हा हनुमंतस्वामींनी दिलेल्या हकीकतीचा इत्यर्थ आहे. ही *हकीकत यथार्थदीपकाकारांची असूं शकणार नाही हे अनेक रीतीने * रामदासस्वामींच्या चरित्राची बखर--पृष्ठे २१०-३०४ पहा. हीच हकीकत काव्येतिहाससंग्रहांत छापिलेल्या वामनचरित्रांत थोड्याशा फरकाने नमूद केलेली आहे..