पान:वामनपंडित.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. ४७ आहे, व याचा यथार्थदीपिकाकारांशी काही संबंध नाही. पण याविषयी पुढे योग्य स्थळी पुरी वाटाघाट होणार आहे. -- ८ आतां हनुमंतस्वामींच्या रामदासी बखरीतील पंडितांविषयींच्या हकीकतीचा विचार करावयाचा. या हकीकतीत मुख्य मुद्दे चार आहेत:(१) वामनपंडित काशीत बारा वर्षे अध्ययन करून दक्षिणेत येत असतां वाटेंत हजारों पंडितांशी वाद करून त्यांनी जयपत्रे मिळविली. अखेर ते आळंदीस आले. तेथे इंद्रायणीच्या तीरी त्यांस एक ब्रह्मराक्षस ब्राह्मणवेषाने भेटला व त्याने सांगितले की, हा वादाचा प्रकार तुम्ही असाच चालवाल तर माझ्यासारखेच पापयोनीला जाऊन ब्रह्मराक्षस व्हाल. तर तुम्ही तुकारामबोवांस शरण जाऊन, त्यांची कृपा संपादा म्हणजे पापमुक्त व्हाल. (२) तेव्हां ब्रह्मराक्षसाचे सांगण्यावरून पंडित तुकारामाकडे गेले व त्यांनी उपदेशाची याचना केली. परंतु, “आम्ही शूद्ग, आम्हांस उपदेश करण्यास अधिकार नाही" असे सांगून बोवांनी पंडितांना रामदासाकडे फेटाळले. रामदासांनी त्यांना बदरिकाश्रमी जाऊन, तप करून ईश्वरी कृपा संपादण्यास सांगितले. पंडितांनी बदरिकाश्रमी बारा वर्षे हरळीच्या मुळ्यांचा रस पिऊन तपश्चर्या केली. परंतु भगवंत भेट देईनात. म्हणून ते वैतागून जेव्हां प्राणहत्या करण्यास सिद्ध झाले, तेव्हां त्यांना चतुर्भुज मूर्तीचे साक्षात् दर्शन घडले. परंतु भगवंतांनी पंडितांना उपदेश देण्याचे नाकारिलें व ते म्हणाले, “आपण उपदेश करू शकत नाही. ते काम साधूंचे आहे. रामदासांसच गुरु करून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागा.” तेव्हां पंडितांची पुन्हां पायपिटी सुरू झाली. रामदासाकडे आल्यावर पंडितांस पुन्हां सांगण्यात आले की, “ आपण श्रीशैल पतावर अवधूतमूर्तीचे दर्शन घेऊन आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी." तानी शैलपर्वतावर अवधूतांचे दर्शन घेतले, परंतु समाधिकाळ जवळ 'पल्यामुळे, अवधूतांनी पुन्हा रामदासावर हवाला देऊन, पंडि. " पाडून दिले. ही अखेरची हुंडी मात्र पटली व पंडित, रामदासबनले. (३ ) एक दिवस पंडित व रामदास यांमध्ये चवदा धान वाद लागला. चौदा ब्रह्मे पंडितांनी स्थापावी व समप.उडवावी, असे अनेक वेळ झाले. पंडितांचा नि:संशय होईना व शिष्य बनले. (३) ब्रह्मांसंबंधाने वाद लाग