पान:वामनपंडित.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. पाडून अर्थ संकुचित करावयाचा नाही, तर येथें तरी का करावा ? 'वाणी' याचा अर्थ ' कमतरता, वाण' असा घेतला म्हणजे लोकार्थ उत्तम त-हेनें लागून, हे पद्य सुभाषितात्मक होतें. ' ज्याची वाणी पूर्ण वेदान्त वदे, तयालागिं वाणी (=कमतरता, वाण, कमीपणा ) (आहे असें,) कसे म्हणावें:' हा सरळ अन्वय. अशा रीतीने हा श्लोक वांध्यांत पडला म्हणजे कै० हंसांनी दिलेल्या चारी श्लोकांत तुकारामाचाच नि:संशय संबंध दाखविणारे असे काहीच उरत नाही. शिवाय त्यांत दुसरी एक गोम आहे ती ही की, त्यांचा चवथा श्लोक 'हरिविलास किंवा 'कालियामर्दन ' या काव्यांत आलेला आहे. तो श्लोक हाः- आत्मा जगज्जीवन वामनाचा । जो सोहळा नित्य नवा मनाचा । नानामृतें ग्रंथ कलौ करीतेो । नामें जना तारक लोकरी तो॥ . तेव्हां ह्याचा तुकारामस्तुतीशी संबंध नसतां तो तेथे कसा तरी घुसविण्यांत आला, यांत शंकाच नाही. राहतां राहिले दोन श्लोक, त्यांतील पहिल्यांत हरिकीर्तनमाहात्म्य आहे व दुसऱ्यांत गुरुकृपचे फळ आहे. तेव्हां हंसांनी दिलेल्या श्लोकांचा असा चिवडा उडाल्यावर त्यांत विश्वसनीय व वरील दंतकथेस उपकारक असें कांहींच राहत नाही. काव्यसंग्रहांतील 'तुकारामस्तुति.' मात्र खरी तुकारामस्तुति आहे. परंतु त्यांत वरील आख्यायिकेचा कोठेच संबंध दर्शविलेला नाही. एकंदरीत ही तुकारामस्तुति पाहूनच वरील आख्यायिका बनविली गेली असेल, असें मानिले तर फारसे चुकीचे होईल असे वाटत नाही. पण ही तुकारामस्तुति पंडितांची मात्र नाही. कारण ईश्वरोपाधियुक्त असे जे चैतन्यस्वरूप श्रीकृष्ण, त्या व्यतिरिक्त इतर देवतांनाही भजणे म्हणजे अश्लाघ्य, असे मानणाऱ्या व कंठरवाने हे मत जगास जाहीर करणाऱ्या पंडितांच्या तोंडून, जया दर्शनें स्पर्शनें मुक्त होती, । तुका नाम वाचेस जे आणिताती । पुनर्जन्म त्या प्राणियालागि कैंचा । तुकारामवाप्पी जया नाम वाचा ॥२ -- अशी स्तुति बाहेर पडेल असे आमचें मन घेत नाही. बहुतकरून हा कोणी तरी त्या वेळच्या गाजलेल्या संतमंडळीच्या पुठ्यांतील 'वामन' असावा. यमक्या व रामदासी वामन तो हाच असा आमचा अंदाज * हुरिबिलास, अध्याय १ श्लो० ६.