पान:वामनपंडित.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. श्रुतिप्रमाणे देऊन समाधान केले. आतां पंडित हे तुकाराम व रामदास यांचे समकालीन होते, हे निगमसाराच्या रचनाकालावरूनच सिद्ध होते. तेव्हां ही आख्यायिका संभवनीय आहे, यांत शंकाच नाही. परंतु हिच्यावर घेण्यासारखे असे दोन आक्षेप आहेत एक आक्षेप हा की, गागाभट्टांना इ. स. १६७३-४ साली शिवाजीमहाराजांचा शास्त्रोक्त राज्याभिषेक करण्याकरितां दक्षिणेत आणण्यात आले होते; परंतु त्यापूर्वी ते दक्षिणेत आल्याचे कोठे प्रसिद्ध नाही. पण तुकारामबोवा तर इ. स. १६४९ या वर्षीच गुप्त झाले होते. दुसरा आक्षेप बराच विचार करण्यासारखा आहे. या प्रसंगी पंडितांनी भट्टजींचे समाधान करण्यासाठी व बोवांचे प्रीत्यर्थ काही श्लोक रचिले होते; ते श्लोक कै० हंस यांनी आपल्या निबंधांत व काव्यसंग्रहांतील स्फुटप्रकरणांच्या तृतीय भागांत छापिले आहेत. परंतु त्यांत चमत्कार हा की हंसांनी दिले आहेत चार श्लोक, व काव्यसंग्रहकारांनी दिले आहेत आठ! आणि त्यातल्यात्यांत विशेष चमत्कार हा की दोघांत समान असा श्लोक एकच आहे !! तो हाःजयाची वदे पूर्ण वेदान्त वाणी । म्हणावें कसें हो! तयालागिं वाणी?॥ परब्रम्हरूपी असा जो तुकावा । तयाचे तुक्री कोण ऐसा तुकावा? ॥ --काव्यसंग्रह. खाली टीत दिलेले या श्लोकाचे पाठभेद महत्वाचे आहेत. त्यांत तिसऱ्या चरणांत कै. वा० दा० ओकांचा 'जो तुकावा' असा पाठ असून कै० हंसांचा ' हा तुका वा ' आहे. अर्थात् पहिला पाठ घेतला तर वरील श्लोकाच्या द्वितीया/चा "असा जो परब्रह्मरूपी मानावा, त्याच्या बरोबरीला दुसरा कोण वर्णावा ? असा सामान्य अर्थ होईल व तो तुकारामांनाच लागू पडेल असे नाही. हंस मात्र 'तुका' हे विशेषनाम घेतात. ओकांनी दुसऱ्या चरणांतील वाणी शब्दाचा अर्थ ' वणिज्' असा दिला आहे. परंतु तिसऱ्या चरणांत जर 'तुका' असे स्वतंत्र पद १. पृष्ठ ९-१०. २. पृष्ठ ५. • हेसांचे पाठभेदः- वेदान्त-वेदार्थ; परब्रम्हरूपी-परब्रम्हरूपी; जो तुकावा-जो तुका वा; ऐसा-दूज़ा.