पान:वामनपंडित.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. शके पंधरा शतें पंचाण्णव । तैं ग्रंथ प्रगटला अभिनव । जो अनादि अनुभव । सकळ संतांचा ॥ -निगमसार, ९-१६३. यावरून पंडितांनी हा ग्रंथ शके १५९५ म्हणजे इ. स. १६७३ त गुंफला हे सिद्धच आहे. तसेच या ग्रंथाचा उल्लेख कर्मतत्त्व, समश्लोकी व यथार्थदीपिका या तीन ग्रंथांत असल्यामुळे, ते ग्रंथ इ. स. १६७३ नंतर लिहिले गेले हेही उघडच आहे. 'नामसुधा' चित्सुधा ' ' गीतार्णवसुधा' इत्यादि ग्रंथांशी नामसादृश्य व प्रौढरचनासादृश्य ज्यांत आहे, असे ' वनसुधा' व 'वेणुसुधा' हेही ग्रंथ यथार्थदीपिकाकारांचे होत. या प्रकरणांतून निसर्गवर्णने फार बहारीची असून, भक्ति, वत्सल व करुण या रसांना ठिकठिकाणी अगदी पूर आलेला आढळतो. जेथे तेथे प्रौढता, सरळपणा व भक्तिनिष्टा ही चमकत असून, अश्लील बीभत्स शृंगाराचें नांवही नाही. 'हरिविलास' 'रुक्मिणीविलास' 'भामाविलास' 'वालक्रीडा' हे ग्रंथ याच मासल्याचे आहेत. या ग्रंथांत वर्णनीय विषयांशी कवीची मनोवृत्ति अगदी तादात्म्य पावलेली आढळते व रसिक वाचकांचीही तत्काळ तीच स्थिति होते, यात शंका नाही. 'प्रियसुधा' हे लहानसें अठरा श्लोकांचे प्रकरण पंडितांनी आपली पत्नी गिराबाई हीस अद्वैतबोध करण्यासाठी रचिलें आहे, असे दिसते. 'अपरोक्षानुभूती' वरील समश्लोकी, गीतासमश्लोकीच्याच तोडीची आहे. 'तत्त्वमाला' व 'राजयोग' हे वेदांतविषयक ग्रंथ यथार्थदीपिकाकारांचेच होत, कारण त्यांतील सर्व विचार दीपिकेंतील विचारांशी जुळतात. येथवर निर्दिष्ट केलेली सुमारे २०-२१ प्रकरणे पंडितांचीच आहेत असें विश्वासपूर्वक म्हणतां येते. आतां इतर प्रकरणांविषयी विचार करण्यापूर्वी पंडितांविषयी प्रचलित असलेल्या दंतकथांचा खल करणे जरूर आहे. ७ प्रथम संतविजयांतील आख्यायिकेची चर्चा करूं. ही आख्यायिका थोडक्यांत अशी आहे- गागाभट्ट व वामनपंडित हे तुकारामबोवांच्या कीर्तनास बसले असतांना, बोवांनी श्रुत्यर्थाचा अनुवाद केला. तेव्हां शूद्राने श्रुत्यर्थ सांगणे, हे गागाभट्टांस न आवडून त्यांनी बोवांचा निषेध केला; परंतु पंडितांनी आपले मत बोवांच्या बाजूने दिले व भट्टजींचे