पान:वामनपंडित.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वासनपंडित. आतां वामन धन्यत्व काय वामन वर्णिल?। की चराचर हे साक्षात् वासुदेव दिसे जयाः॥८ तरि गीतार्थ जो जाणे, कृतकृत्य असाच तो। असा न जो, तया गीता बरवी कळली नसे. ॥९ -समश्लोकी, उपसंहार. असो आतांपर्यंत पंडितांची म्हणून कायम झालेली सर्व प्रकरणे वेदांतविषयक आहेत. यांपैकी निगमसार व अनुभूतिलेश या ग्रंथांत पंडितांना सच्चिदानंदयतिवेषाने जो ईश्वरी साक्षात्काराचा योग मलयपर्वतावर जुळून आला, त्याची कच्ची हकीगत दिलेली आहे. हीच गोष्ट पंडितांनी पुन्हां यथार्थदीपिकेशिवाय समश्लोकी, व कर्मतत्त्व या प्रकरणांत निर्दिष्ट केलेली आहे. म्हणजे या तेरा ग्रंथांपैकी पांच सहा ग्रंथांत या गोष्टीची पुनरावृत्ति झाली आहे. हे पुन्हा पुन्हां सांगण्यांत आत्मप्रौढीचा पंडितांचा हेतु नाही, तर जिज्ञासु जो तया भेटे गुरुरूपें रमापती,। 1 मरे इतुकियामध्ये, तरि पावेचि मुक्ति तो.।। -स० श्लो० उपसं० १९. हे तत्त्व लोकांच्या मनांत पूर्णपणे बिंबवावे हा त्यांचा पवित्र मानस आहे. ज्या अर्थी भगवंत आपले गुरु झाले व ते सच्चिदानंदनांवानें व यतिरूपाने आपल्यास भेटले, असें पंडित वारंवार निक्षून सांगत आहेत, त्या अर्थी पंडितांचे समर्थांशी गुरुशिष्याचे नातें लावणाऱ्या दंतकथा केवळ फिक्याच पडतात. यांपैकी कोणत्याही ग्रंथांत पंडितांनी आपले कुळगोत, गांव, आईबाप याविषयी यत्किचित्ही उल्लेख केला नाही. या सर्व ग्रंथांत निगमसार हा ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे; कारण, पंडितांनी इतर कोणत्याही प्रकरणांत रचनाकाळाचा निर्देश केलेला नाही. परंतु या प्रकरणांत मात्र तो त्यांनी सुदैवाने नमूद केला आहे. १. निगमसार, १-९-६८ पहा. ' २. मागें पान २० टीप पहा. ३. समश्लोकी, उपसंहार १६-१८ पहा. ४. कर्मतत्त्व,१-४-५ पहा.