पान:वामनपंडित.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरखतीमंदिर. आहे; कोणताही महत्वाचा विषय राहिला नाही. हीतील गीतेच्या भाषातराची धाटणी अनुपमेयच आहे. जोमदार, सुलभ व आटोपशीर भाषांतर कसे करावयाचे हे शिकणारांनी हा समश्लोकीचा मायना पुढे ठेविला, तर वावगे होणार नाही. मोरोपंत कवी या समश्लोकीला इतके भाळले, की त्यांनी आपली गीतेवरील आर्याटीका वामन पंडितांच्याच समश्लोकीवरून रचिली; पंडितांचेच शब्द पंतांनी आपल्या आवडत्या छंदांत गुंफले ! ही गोष्ट दोन्ही टीका एकदम वाचल्या म्हणजे सहज ध्यानात येईल. पंतांनीही लपवाछपवी न करितां उघडपणे ही गोष्ट आपल्या टीकेच्या उपोद्घातांत व पुढेही मधून मधून कबूल केली आहे. पंत म्हणतात: श्रीमद्वामनविरचित गीताटीकोत्तमा समश्लोकी,। आर्याटीका तेचि, च्छंद निराळे, विचित्र हे लोकीं ॥ -आर्याटीका ( उपोद्घात) १७. ऐसें बोलेल हरी पार्थाचा प्रभ होतसे आधीं। वामनमतेंचि गाइल आर्याछंदें मयूर ही साधीं.॥ -आर्याटीका ५-९. या समश्लोकीविषयीं. पंत पंडितस्तुतींत म्हणतात रीति समश्लोकीची अतुला साधेल काय नव्यास?। : या सुयशें होइल का रोमांचव्याप्तकाय न व्यास ? ॥ ६ ही समश्लोकी टीका पुरी झाल्यावर पंडितांना जो काही आनंद झाला तो गगनीं मावेना! आपल्या हातून हे पवित्र कृत्य ईश्वरी कृपेनें निर्विघ्नपणे व उत्तम रीतीने पार पडले म्हणून पंडितांनी उल्हासाचे भरांत उपसंहारांत असे उद्गार काढिले आहेतः"माता धन्य, पिता धन्य, धन्य धन्य सुहृत्सखे !। केले गीतार्थ गूढार्थ हृदयांत प्रकाशिता.॥७

  • पंतांच्या हातून महाभारताचा मराठी तर्जुमा पुरा झाला तेव्हां त्यांनीही अशाच प्रकारचे उद्गार काढिले आहेत

धन्य श्रीराम पिता, धन्या लक्ष्मी प्रसू जगी झाली। आली सत्यवतीची, की भारतकीर्ति सुतमुखीं आली.॥ -स्वर्गारोहणपर्व, ४२.