पान:वामनपंडित.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. पर्वतावर झालेल्या भगवत्साक्षात्काराची यथास्थित हकीकत आहे, तेव्हां तेंही प्रकरण पंडितांचे निःसंदेहच ठरतें. : गीतार्थ वर्णितां ग्रंथ वादेल अपरांपर। समश्लोकी प्रतिज्ञा हे केली यास्तव माधवें.॥ , -समश्लोकी,-उपसंहार ५. । या श्लोकावरून समश्लोकीच्या नंतर पंडितांनी यथार्थदीपिका रचिली असें सरळ अनुमान निघते. अशा प्रकाराने वामनपंडितांचे एकंदर १३ ग्रंथ निःसंशय कायम करितां येतात. ते येणेप्रमाणे-१ अनुभूतिलेश (संस्कृत), २ श्रुतिसार (संस्कृत), ३ निगमसार, ४ हरिनामसुधा, ५ चित्सुधा, ६ गीतार्णवसुधा, ७ कर्मतत्त्व, ८ ब्रह्मस्तुति, ९ *योगवासिष्ट, १० समश्लोकीगीताटीका, ११ यथार्थदीपिका, १२ चरमगुरुमंजिरी व १३ उपादान. ही सर्व प्रकरणे वेदांतविषयक आहेत, व बहुतेक सर्व श्लोकबद्ध आहेत. अक्षरवृत्तांचे बंधन असूनही पंडितांची रचना या सर्व प्रकरणांतून यथार्थदीपिका व निगमसार या ओवीबद्ध प्रकरणांप्रमाणेच जोरदार, प्रौढ, सरळ व वळणशुद्ध आहे. विषयप्रतिपादनाची शैली थेट यथार्थदीपिकेसारखीच आहे. कित्येक मुद्यांसंबंधे तर यथार्थदीपिकेंत याच प्रकरणांवर हवाला दिलेला आहे. या सर्व प्रकरणांत हरिनामसुधा व कर्मतत्त्व ही प्रकरणे फार मधुर, रसाळ व भक्तीने थबथबलेली आहेत; व त्यांतील बरेचसे वेंचे देण्याचा आम्हांस मोह पडत आहे. परंतु स्थलसंकोचामुळे मन आवरणे जरूर पडतें ! समश्लोकी गीताटीका तर अप्रतिमच आहे. तीत कित्येक अध्यायांच्या आरंभीच्या उपोद्घातांत व अखेर उपसंहारांत गीतेशी विसंगत असणाऱ्या सर्व मतांचा पंडितांनी थोडक्यांत निरास केला आहे. यथार्थदीपिकेची प्रचंड ग्रंथसंख्या पाहून ज्यांची छाती दडपत असेल व म्हणून ती हातांत धरण्याचा ज्यांस उत्साह वाटत नसेल, त्यांनी ही समश्लोकी अवश्य वाचावी. हीत यथार्थदीपिकेचें भरपूर सार आलेले " यांत पंडितांनी आपला प्राकृतभाषाभिमान दर्शविला आहे: वदो भाव त्याचा महाराष्ट्र वाणी । जरी शब्द थोडे, न अर्थास वाणी ॥४॥