पान:वामनपंडित.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित.. खरा होता, व ज्ञानेश्वरांसंबंधे त्यांनी जे विशेष अनुमान काढिले आहे तें ठार लंगडे पडतें.. ५ आतापर्यंत यथार्थदीपिकेची जी चांचणी करण्यांत आली, तीवस्न वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, भगवंतांनी सच्चिदानंदनामक यतिरूपानें वामनपंडितांस भेट देऊन ब्रह्मविद्यारहस्याचा म्हणजे ज्ञान• निष्ठ सगुणभक्तीचा उपदेश केला. पंडितांना प्राकृत भाषेचा अभिमान होता, त्यांची प्राकृतरचना प्रयोगशुद्ध आहे व संस्कृताभिमानी पंडितजनांचा त्यांना किळस होता. गीतेचा यथार्थ अर्थ व्यक्त करण्यासाठी पंडितांनी दीपिका रचिली. काव्य रचण्याचा त्यांचा हेतूच नव्हता व गद्य ग्रंथाचा प्रघात असता, तर त्यांनी ही टीका गद्यांतच लिहिली असती असें अनुमान होते. गीतेत केवळ भागवतधर्म आहे व त्याचे मुख्य लक्षण अद्वैतज्ञानयुक्त संगुणभक्ति हे होय. ज्ञानहीन सगुणभक्तीस, तसाच भक्तिहीन अद्वैतज्ञानास भागवतधीत थारा नाही, हा पंडितांचा आद्य सिद्धांत व याचेच स्पष्टीकरण त्यांनी पहिल्या अध्यायाच्या आरंभापासून तो अठराव्याच्या समाप्तीपर्यंत यथास्थित भगवदुक्तीला अनुसरून केले आहे. श्रीकृष्ण हे चैतन्याचे ईश्वरोपाधियुक्त स्वरूप - होय व सगुणभक्ति त्याचीच केली पाहिजे. इतर देवता उपाधिभेदानें कमी दर्जाच्या ह्मणून क्षुद्र होत. तेव्हां ज्याला गीतेचा बोध झाला आहे, त्याने श्रीकृष्णाव्यतिरिक्त अन्य देवतेचे भजन करूंच नये. पंडितांचा ज्ञानेश्वरांवरच विशेष कटाक्ष आहे, असा प्रकार मुळीच नाही. ज्यांनी, ज्यांनी जाणून किंवा चुकून गीतोक्तीचा विपर्यास केला आहे, त्यांत्यांवर पंडितांनी आक्षेप घेऊन यथार्थ अर्थ स्पष्ट केला आहे. धर्मासंबंधे हल्लींची समाजस्थिति व. पंडितांच्या वेळची स्थिति बहुतेक. सारखीच भासते. हल्ली जसे निर्गुणवादी, प्रत्यक्षवादी, भेदवादी, नास्तिक वगैरे निरनिराळे पंथ आहेत, तसेच त्या वेळी होते. हल्लींचा केवळ सगुणवादी वारकरी पंथ त्या वेळी उदय पावला होता. हल्ली जसे बरेचसे संभावित लोक कुटाळक्या करण्यांत, पत्ते खेळण्यांत किंवा बुद्धिबळाच्या पटावर लढाया मारण्यांत सर्व वेळाचा चुराडा करून ईश्वराचे भक्तिपूर्वक स्मरणही करीत नाहीत, तशीच स्थिति त्या वेळीही होती. दांभिक, सिद्ध, बायाबापड्यांना