पान:वामनपंडित.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. • *गीताकथनाचें फळ' इत्यादि मुद्यांवरील पंडितांनी दिलेले यथार्थ टोमणे ज्ञानेश्वरांना पूर्णपणे लागू पडतात यांत संशय नाही. तसेच पंडितांनी आपल्या टीकेला यथार्थदीपिका हे नामाभिधान दिले, त्या वेळीही त्यांचा कटाक्ष ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेवर असावा, हेही, संभवनीय आहे. परंतु याशिवाय अनेक वादविषय यथार्थदीपित आले आहेत, त्यांचा ज्ञानेश्वरांशी मुळीच संबंध नाही. चार्वाकादि नास्तिक, भेदवादी, निर्गुणैकवादी इत्यादिकांवर जे सणसणीत कोरडे ओढले आहेत, त्यांचा तर ज्ञानेश्वरांशी बादरायण संबंधसुद्धां जोडतां येत नाही. तशांत कित्येक ठिकाणी 'कोणी अलीकडील टीकाकार' असेही शब्द पंडितांनी योजिलेले आहेत.-. काकडील कोणी टीकाकार करून त्या पक्षाचा अंगीकार । 'ज्ञानियास नलगे सगुण साकार' । बोलती ऐसें ॥ १५० ॥ -अध्याय १२. अलीकडील कोणी भले । अनुभवी जरी जाले। त्यांसही मनीं संस्कार राहिले । त्या ग्रंथांचे इत्यादि ॥ ६०५॥ -अध्याय १५. अर्थात हे टीकाकार पंडितांचे समकालीन अंसले पाहिजेत हे उघड आहे. त्याप्रमाणेच-. ..कोणी प्राकृत ग्रंथकार । मनास म्हणती भोक्तृत्वप्रकार । तो तो सर्वथा विरुद्ध विचार । प्रमाण, अनुभव, युक्तीसही ॥२४७६| --अध्याय १२. या ओवीत व पंधराव्या अध्यायांतील नवव्या श्लोकावरील टीकेत. ज्या प्राकृत टीकाकारांचा पंडितांनी उल्लेख केला आहे, त्यांत ज्ञानेश्वरांचा अंतर्भाव होत नाही. कारण ज्ञानेश्वर मनाचे ठिकाणी भोक्तृत्व मुळींच मानीत नाहीत. तेव्हां याचा इत्यर्थ इतकाच की, पंडितांनी ज्ञानेश्वरांवरच असा विशेष कटाक्ष ठेवलेला दिसत नाही. ज्यांचे ज्यांचे म्हणून मत गीतावचनांशी विसंगत असे भासले, त्यांच्या त्यांच्यावर त्यांनी सप्रमाण टीका केली आहे. तेव्हां 'बहुवचनी प्रयोगं योजिल्यामुळे अनेक टीकाकारांस लक्षून बोलल्यासारखा ' जो भास कै० हंसांना झाला तोच * गीता १४१६८ यावरील ज्ञानेश्वरी टीका व पंडिती टीका पहा.