पान:वामनपंडित.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. अन्य टीकाकारांची मुळीच प्रसिद्धि नाही; व सिद्धीच्या साधनाने टीकांची जगांत प्रसिद्धि केली हा आरोप ज्ञानेश्वरावर फार चांगल्या प्रकारे लागू होतो.” या विधानावर बरेचसे आक्षेप घेतां येण्यासारखे आहेत. एक तर वामनपंडितांच्या वेळी म्हणजे इ. स. १७०० च्या सुमारास गीतेवर बऱ्याच प्राकृत टीका झालेल्या होत्या व त्यांपैकी काही तर विलक्षणच विस्तृत आहेत, असें अलीकडे आढळून आले आहे. पंडितांच्या वेळी पुढील प्राकृत गीताटीका अस्तित्वांत होत्या व त्या हल्लीही उपलब्ध आहेत : १ ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका. २ दासोपंतांचा गीतार्णव. ( हा 'महाराष्ट्रकवीत' प्रसिद्ध होत आहे. । हा ग्रंथ १,२५,००० आहे असे म्हणतात.) ३ दासोपंतकृत गीतार्थबोधचंद्रिका व इतर टीका. ४ मुक्तेश्वरकृत गीतेचे भाषांतर. ५ उद्धवचिद्धनकृत गीता-सवाई. ६ तुकारामकृत गीतेचे अभंगात्मक भाषांतर. ७ रंगनाथस्वामिकृत चिदानंदलहरी. याशिवाय आणखी अनेक प्राकृत टीका इ. स. १७०० च्या पूर्वी झालेल्या असतील, परंतु त्या अद्याप उपलब्ध झाल्या नाहीत. लेव्हां टीकाकार या बहुवचनांत केवळ ज्ञानेश्वरांचा अंतर्भाव होतो, असें नाही. तर त्यांत वरील सर्व ग्रंथकर्ते जमा केले पाहिजेत, हे उघड आहे. आतां 'क्षुददेवतामंगलाचरण,' 'धर्म्यपद,' 'सिद्धी मिरवणे,' 'हठयोगाचा पुरस्कार' 'अप्रयोजक दृष्टान्त' जनसंसद्' १. मागें पृष्ठ ३२ वरील (५) हा उतारा पहा. २. इ. स. १५५१-१६१६. (समाधिकाळ, शके १५३७ माघ वद्य षष्ठी).. ३. इ. स. १६०९-१६६०. . ४. इ. सनाचे सतराव्या शतकाचा पूर्वार्ध. ५. इ. स. १६०८-१६४९. ६. इ. स. १६१२-१६८४. ७. गीता ९।६ यावरील ज्ञानेश्वरी व दीपिका यांतील टीका पहा. ६. मागील पानावरील उतारा व त्या प्रसंगाची ज्ञानेश्वरी टीका पहा.