पान:वामनपंडित.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. जो असूनि वैकुंठी नसे । वसोनि योगियांच्या हृदयीं जो न बसे । तो स्वकीर्तनी वसे, की तेथे गवसे । कामधेनूचे स्तनी जेवि दुग्ध । ऐसा हरिकथासमाज । ते जनसभा म्हणतां वाटे लाज । श्रवणरंधे रिघे हृदयीं महाराज । देवाधिदेव श्रीपती जे सभे ॥७३८॥ श्रवण करितां परीक्षिती । न पुरे योगियां भक्तां क्षिती। श्रीमद्भागवतार्थ लक्षिती । की सर्वभूतीं वासुदेव ॥ ७३९ ॥ भीष्माचिया देहावसानीं । शरपंजराभोंवते योगी मुनी । ते जनसभा काय म्हणोनी । म्हणवेल ?॥ ७४०॥ वक्ता सूत जातिहीन । श्रोते शौनकादि मुनि सज्जन । श्रोते बदरीस तपोधन । वक्ता नारायण नरसखा ॥ ७४३॥ एवंच जेथें अध्यात्मकथा । ते जनसभा नव्हे सर्वथा । गाती ऐकती जगन्नाथा । जे सभेमध्ये ॥ ७४४ ॥ तेच वर्जावी जनसभा । जेथें न वर्णिती पद्मनाभा । एकांती ध्यावें श्रीवल्लभा । यदर्थ विविक्तदेशसेवित्व ॥ ७४५ ॥ क्षण एकांती न बैसवे । जनसभे बैसतां न उठवे । जनवार्तेपुढे केंवि आठवे । कैवल्यनाथ? ॥ ७४७॥ सरलियाही संसारवंदा । क्षण नाठवी मुकुंदा । देखोनी ग्राम्यजनदंदा । त्यांत कंठी तो काळ ॥ ७४९ ॥ जरी जनसभा न सांपडे । तरी निजे उलथा पालथा पडे । समानशळि मिळतां गडे । द्यूतकर्म सोंगटी आरंभी ॥ ७६०॥ -अध्याय १३. पंडितांचा काळ ठरविण्याचे साधन यथार्थदीपिकेंत नाही. परंतु त्यांनी यथार्थदीपिकेंत (१५।१६०३) आपल्या 'निगमसार' नामक ग्रंथाचा उल्लेख केला आहे. निगमसाराच्या शेवटी ग्रंथसमाप्ति शके १५९५ म्हणजे इ. स. १६७३ या साली झाल्याचे आहे. आतां पंडिताना निरनिराळ्या टीकांचे जे खंडण केले आहे त्याविषयी हंस आपल्या निबंधांत लिहितात की, यथार्थदीपिकेंत “प्राकृत टीकाकारांच्या नांवाचा उल्लेख स्पष्ट नाही व बहुवचनी प्रयोग योजिलेला आहे. यामुळे अनेक टीकाकारांस लक्षून बोलल्यासारखाही भास होतो; तथापि ज्ञानेश्वरावाचून १ हंसकृत वामनपंडितावरील निबंध. पृष्ठ ४५-४६.