पान:वामनपंडित.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. ज्यास ज्ञानाची लागली गोडी । सगुणी अत्यंत आवडी। त्याणे या भागवतधर्मामृती बुडी । दावी आणि बाहेर न निघावें ॥ गार उदकाची उदकीं । बुडवितां हळुहळू विघरेच की। तैसा सर्वाकार सर्वेश या *उत्तम श्लोकीं । जो बुडी देतो तो अनन्य तद्भक्त ॥२१४६॥ यावेगळे धर्म सकळ । टाकून आश्रय त्याचाच केवळ । धरितां बाणे पुष्कळ । सर्वात्मता समाधी ॥२९४७ ॥ -अध्याय १८. हा भागवतधर्म पाळण्याला, ईश्वराची तादात्म्याने भक्ती करण्याला व मन निवांत आणि निश्चळ राहण्याला, एकांत स्थळे किंवा गिरिगुहा पाहिजेत असे नाही. परंतु विषयी, आळशी, लोभी, विलासी अशा प्रकारची मंडळी मात्र टाळली पाहिजे; कारण अशी मंडळी स्वतः पुण्यसाधन न करितां, दुसऱ्या साधुसंतांची मनें चंचळ व दूषित करण्याचा मात्र प्रयत्न करिते. प्रेमळ भगवद्भक्तांची संगती सोडून भगवचिंतनाकरितां किंवा ध्यानसमाधीकरितां विविक्त प्रदेशांत जाण्याची जरूरी नाही. भागवतधर्माचे संगोपन भक्तसभांतच झालेले आहे व अशा सभा टाळणे म्हणजे केवळ अज्ञान होय. तेराव्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकांतील 'जनसंसदि' या पदाचे विवरण करितांना पंडितांनी हे विचार नमूद केले आहेत. भक्तसभेत जातिभेद किंवा अन्य भिन्नभावही राहू शकत नाही असेंही पंडितांनी त्याच स्थळी सुचविले आहे. जनवार्ता करिती जन । काय तेथें घडेल भजन । म्हणोनि कंटाळे मन । एकांतवास तरी घडे ॥ ७३६ ॥ आणि ते म्हणावी जनसभा । जेथे विसरले श्रीवल्लभा । ज्या सभेत तो सादर उभा । ते हरिकीर्तनसभा जनसभा न म्हणावी

  • मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने

प्रियोसि मे || १८१६५ 1 मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेशसेवित्वमरतिर्जन संसदि ॥ १३।१०