पान:वामनपंडित.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. कावळा अमृत प्याला ! वंश अवघा अमर जाला । म्हणोनि अमृत मिळतां मानव भला । न करी पान कावळा म्हणोनी॥ टाकोनी हरिकथामृत । निराहारी बसे जागत । फळ देईलही व्रत । परि नव्हे कृपापात्र देवाधिदेवाचें ॥ १०९० ॥ वाणीही मेळवी धन । धनचि मेळवी रायाचा प्रधान । परि तो रायासमान । ग्राम्य तुच्छ धनिक हा ।। १०९१ ॥ क्षण निद्रा येतां दिवसा । भंग जाला उपवासा । हरिनामप्रताप नव्हे ऐसा । की नाम पूर्ण करी न्यूनातें ॥ १०९२ ॥ व्रत सफळ नामें परम । विना नाम सकळ अंगहीन कर्म । एकादशी तो भागवतधर्म । नामावांचून, शव जैसे विनाप्राण॥१०९३॥ -अध्याय ९. वरील उताऱ्यांत पंडितांचा भागवतधर्माविषयींचा सदभिमान व हरिनामकीर्तनावरील अकृत्रिम प्रेम ही सारखी प्रस्फुरत आहेत. भक्तिहीन कर्मठांची ही अडीचशे वर्षांपूर्वीची स्थिति आजकालही तंतोतंत तशीच दृष्टीस पडत आहे. अशा कर्मठांचाच समाजांत असंख्य भरणा आज जर आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे, तर आपली धर्मबद्धि निःसत्त्व झाली आहे व भागवतधर्म निर्जीव झालेला आहे, असे म्हणणे वावगे होईल काय? या उताऱ्याप्रमाणेच पंडितांनी भागवतधर्माची व्याख्या अनेक ठिकाणी केली आहे: की प्रथम कर्मकांड । त्यापुढे उपासनाकांड । तिसरें तें ज्ञानकांड । मधील कांड उपासना ॥ ८०२ ॥ ती कांडियांचा ऊस । मधली कांडी स्पर्शली दोहींस । खालील वरिलीस आणि वरिली खालिलीस । कांडी स्पर्शली नसे .. जे रीती ॥८०३ ॥ ज्ञानास नातळे कर्म । कर्मास नातळे ब्रह्म । उपासनारूप भागवतधर्म । दोहीस लागला ॥ ८०४ ॥ सर्वही तोचि वासुदेव । जो जडालंकारी चित्सुवर्ण स्वयमेव । इत्यादि कीर्तनादिकीही सर्वात्मभाव । ज्ञानाश्रित भागवतधर्म ये रीती . -अध्याय १२.