पान:वामनपंडित.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. - जेथे जेथें भगवदुक्तीचा विपर्यास झाला असे त्यांना खात्रीने वाटलें, तेथे तेथें प्रतिपक्षावर तीव्र प्रहार करण्यांत त्यांनी मुळींच कसूर केली नाही, मग तो प्रतिपक्षी भाष्यकार असो, एकादा लोकप्रिय सिद्ध असो वा व्यासपीठावरून गीतेची व्याख्या करणारा एकादा आपला समकालीन महापंडित असो! टिळेमाळा करून, भागवत धर्माचा टेंभा मिरवून, भक्तिहीन बुद्धीने एकादशीचे उपासतापास करून सर्व वेळ गप्पाष्टकांत घालविणाऱ्या कर्मठांचाही पंडितांनी चांगला समाचार घेतला आहे. एकादशीला उपवास करण्याला ऋषींनी सांगितले आहे; परंतु लोक त्या शासनाचे खरे मर्म ध्यानांत न ठेवितां केवळ बाह्य कसरती व दिखाऊ कमें कशी करितात व एकंदरीत त्यांच्याकडून निर्जीव देहाला आलिंगन देण्याचे हास्यास्पद प्रकार कसे घडतात, यांचे पंडितांनी नवव्या अध्यायांत असे वर्णन केले आहे:'नामावांचूनि सदाचार । ते सकळही वेडेचार । पाय उचलोनी मूत्राची धार । निराळी सोडी श्वानही॥ १०७९॥ नामावांचूनि आंघोळी । त्या वेडुकांच्या बुड्या जळीं । जळी सर्वदा असे मासोळी । दुर्गंध अंगी अनिवार॥१०८०॥ हरिनाम न म्हणे वाचा । निराहार उपवास एकादशीचा । बाशिंग अलंकार मस्तकाचा । बांधिजे जे तिी पाठीसी ॥१०८१ ॥ अहोरात्र जागर उपवास । उपयोगी हरिनामकीर्तनास । म्हणोनि निद्राहार जनास । ऋषि ते दिवशीं वर्जिती ॥ १०८२ ॥ हे स्पष्ट बोलतां जन । कीर्तन करिती करोनि भोजन । म्हणोन करते जाले शासन । उपवासाचें ॥१०८३॥ विशेषे एकादशी दिनीं । ऋषि म्हणती करावी दोनी । अहोरात्र जागरणीं । एवं कीर्तनी तात्पर्य ॥ १०८५ ॥ उपवास करी निराहार । सोंकटी खेळोनि जागर । तो नव्हे व्रताचा बडिवार । मुख्य कीर्तन ऋषि बोलती ॥ १०८६ ॥ सासू सुनांचे भांडण । घडला उपवास जागरण । ते पुण्य एकादशीचें, कारण । जाले विमान जावया ॥ १०८७ ॥ म्हणोनि हरिकीर्तनाविण । निराहार आणि जागरण । करिती, त्यांसही व्रतगुण । होय, अमृतें अमरता जैसी काकासी ॥