पान:वामनपंडित.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. या प्रकारचे नर फार । ज्यांस सार वाटे असार । त्यांस दृष्टीं पडे जरी अर्थ सार । तरी प्रिय नव्हे ॥१८३३॥ की जो अर्थ वदतां आपण । जनांत म्हणवी निपुण । त्यास बाध लागतां ज्ञातेपण । आपलें उडतसे ॥ २८३४ ॥ स्वहिताची चाड असे । तरी जो अर्थ सार दिसे। त्याच अर्थी बुद्धि वसे । सोडी बाधिता अर्थातें ॥ १८३५ ॥ भक्तचि हे टीका वंदिती। अभक्त तितके निंदिती। दोन्ही समान, एक जगन्मय जगत्पती । संतुष्ट होईल तेंचि पुरे ॥ १८३९ ॥ -अध्याय १२. (४) जे निर्मत्सर यती । ते तो हाचि अर्थ मानिती। . जे साभिमान त्यांची भीड किती? । की त्यांस भिउनी बो -लावें अन्यथा ॥ २९७ ॥ हे यथार्थदीपिका । यथास्थित अर्थाची प्रकाशिका। स्वयें भगवंत करितो टीका । भीड येथे कोणाची?॥२९८ ॥ ... -अध्याय १८. वंदिती पूजिती तुझे चरण । तरी अंतरी इतरदेवताशरण । करिती क्षुद्रदेवतामंगलाचरण । इच्छोनि निर्विघ्न कविता स्फूर्ती ॥ २५॥ जगी मिरवोनी सिद्धी । आपल्या टीकांची केली प्रसिद्धी। तथापि नाही झाली अर्थसिद्धी। यथार्थगीतारहस्याची॥ २७ -अध्याय ९. अशा त-हेचे बाणेदार, निर्भीड उद्गार वामनपंडितांनी वारंवार काढलेले आढळतात. दांभिक, बोकेसंन्यासी, क्षौरीसोदे, आणि ज्ञानीपणाचा व निस्पृहत्वाचा आव घालून लोकप्रियता व लौकिक यांसाठी धडपडणारे छमी लोक यांसंबंधे पंडितांच्या मनांत किती तिटकारा बाणला होता, हेही वरील उताऱ्यांवरून स्पष्ट होते. सत्यापुढे व भगवद्वचनापुढे आपण कोणाचीही चाड धरणार नाही ही भीष्मप्रतिज्ञा तडीस नेण्यांत पंडितांनी आपल्या अंगचे अतुल नीतिधैर्य जगाच्या निदर्शनास आणून दिले आहे, यांत तिळमात्र शंका नाही.