पान:वामनपंडित.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरखतीमंदिर. यासारखे दुसरें अश्लाघ्य खूळच नाही, असें पंडित म्हणतात. ग.तेवरील टीकाकाराला मंगलाचरण करणे असेल तर श्रीकृष्णाचेच केले पाहिजे. ग्रंथार्पण करणे असेल तर ते श्रीकृष्णासच केले पाहिजे. कारण त्याहून अधिक पराक्रमी, अधिक ईश्वरोपाधियुक्त, अधिक तेजस्वी व अधिक मंगल असे कोणतेही सगुण दैवत असणे शक्य नाही. गीताटीकाकारांनी कृष्णाशिवाय इतर क्षुद्र देवतांच्या भजनीं लीन होणे, म्हणजे आपल्या अज्ञानाची किंवा दंभाची टिमकीच वाजवणे आहे, भगवंताच्या उक्तीस हरताळ लाविणे आहे व श्रेष्ठ गुरूला सोडून क्षुद्र बटकीची सेवा करणेच आहे असें पांडित समजतात. या एकंदर गोष्टीविषयीं यथार्थदीपिकेंतून थोडेसे उतारे दिल्यावांचून आमच्याने राहवत नाही. (१) मंगलाचरणीं क्षुद्र देवता । त्यांस कठीण अत्यंत हे गीता। विना गीताकार अनंता । कोण टीकाकार टीका करील गीतेची? ॥६७९ ॥ अद्वैताच्या आश्रये । ब्रह्मचि सर्व देवता या निश्चयें। आम्ही ज्ञानी जगद्गुरु स्वयें । ऐसें मानूनि वर्म चुकलें स भक्तीचें ॥ ६८० ॥ ब्रह्म सर्वत्र सम । तरी घरची बटिक काय नव्हे ब्रह्म । कां तिचे श्रवण कीर्तन न करावें परम? । कां मंगलाचरण तीचे करूं नये? ॥६८१ ॥ देवता विघ्न हरी । तेच मंगलाचरणीं वंदावी कां परी?। एवं ब्रह्म सर्व, परि उच्चनीच पायरी । एकएकाची उपाधि _____भेदें ॥ ६८२ ।। एवं ईश्वरोपाधियुक्त निर्गुण । तेंचि एक भजावें सगुण ।। हे न कळोनि गीताप्रोक्त खूण । तक पिती दुग्ध म्हणोनि।६८३॥ हे परटीकाषण । आणि स्वटीकाभूषण । अभिमाने की न्यायें हे विचक्षण । पाहोत पूर्ण दीर्घ दृष्टी ॥ ६८५ ॥ -अध्याय ९. (२) आतां हे यथार्थदीपिका । यथार्थ गीतार्थ त्याची दीपिका । कलियुगतमांत प्रकाशिका । गीतार्थाची प्रगटली ॥११४९॥