पान:वामनपंडित.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. वेदान्तसूत्रवक्ता व्यास ! वका गीतेचा जगनिवास । जो अधिकारी या श्रवणास । तोचि वेदांतश्रवणास अधिकारी ॥ ११८ ॥ गीतेस जें जें संमत ! तें तेंचिं वेदांत मत । गीतानुरूप जो सिद्धान्त । तोचि वेदांत जाणावा ॥ ११९ ॥ -अध्याय १८. पंडित हे एकंदरीत फार धोरणी, सारासारविचारी, कल्पक, निस्पृह, सत्याभिमानी व वाणीचे खंबीर असे होते. सत्याचे प्रतिपादन करितांना त्यांनी कोणाचीही भीडभाड धरलेली दिसत नाही. आपले ग्रंथ कोणी वाचोत वा न वाचोत, दुसऱ्याच्या आराधनेसाठी, लौकिकासाठी किंवा लोकप्रियतेसाठी सत्यास धाब्यावर बसवून दंभ किंवा मुग्धता स्वीकारावयाची नाही हा त्यांचा दृढ संकल्पच होता. सत्यनिष्ठेने उचंबळून हा आपला बाणा पंडितांनी अनेक ठिकाणी स्पष्टपणे निर्दिष्ट केलेला आहे. गीतेमध्ये केवळ एकट्या भगवंताची अनन्य-अव्यभिचारिणी-भक्ति उपदेशिलेली आहे. श्रीकृष्ण म्हणजे गीताकार हाच या भगवंताचा, परव्रह्माचा, परंधामाचा सर्वश्रेष्ठ ईश्वरोपाधियुक्त अवतार. ज्याला ज्याला म्हणून गीता पूर्णपणे समजली, त्याच्या त्याच्या अंतःकरणांत अद्वैत व श्रीकृष्णाविषयी अव्यभिचारिणी सगुणभक्ति बाणलीच पाहिजे. सर्व जीवात्मे-हे सर्व विश्व-जरी एकाच परमात्म्याचे-एकाच चैतन्याचेअंश आहेत, तरी त्यांत उपाधियोगानें उच्चनीचभाव उत्पन्न झालेला आहे. ज्यांना अद्वैतज्ञान प्राप्त झाले नाही, ज्यांना गीतेचा बोध झाला नाही, किंवा ज्यांना अव्यभिचारिणी सगुणभक्तीचे तत्त्व उमजलें नाहीं, त्यांनी श्रीकृष्णाव्यतिरिक्त अनेक देवतांचे भजनपूजन केले तर काही तरी क्षम्य आहे; परंतु गीतार्थ ज्यांच्या चित्तांत पूर्णपणे बाणला आहे, जे प्राकृत जनांसाठी गीतेवर टीका करण्याची महत्वाकांक्षा धरून आपल्या वाणीला चाळवितात, त्यांनी 'सर्वदेवान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोचयिष्यामि तत्त्वतः ॥' असें असंदिग्ध वचन देणाऱ्या गीताकार परमात्म्या श्रीकृष्णाला सोडून, मंगलाचरणी इतर दवांच्या भजनी लागणे आणि पुन्हा अव्यभिचारिणी भक्तीचे गोडवे गाणे