पान:वामनपंडित.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. पुराणां सर्वांहुनी । श्रेष्ठ भारत म्हणुनि। प्रसिद्ध त्यांत विशेषेकरूनी । भगवद्वचनपीयूष हे गीता.॥२०४ यापुढे गोष्टी सकळा । बोलतां पावती अवकळा । की उगवतां भानु सगळा । गतप्रभ होती नक्षत्रे. ॥ २०५ पुराणी जे जे विरोध । त्यांचा बरा करितां शोध । सिद्धान्त ऐसा म्हणूनि होय वोध । बहु पुण्ये करोनी. ॥ २०६ -अध्याय १४. (२) आतां 'ममैवांशो जीव' । पंचदशी बोले देव । तेथें भेदवादी काढिती भाव । भिन्नांश म्हणोनी ॥ २७४ ॥ त्यास कल्पित वचन । एक दाविती नवीन । की मत्स्यादि अवतार अभिन्न । जीव भिन्नांश म्हणूनी ॥२७९ ॥ कल्पूनि कल्पित वाणी । हे म्हणती आहे पुराणीं। दाटून कल्पित काहाणी । बोलती वेदास, गीतेस, युक्तीसही विरुद्ध ॥ २७६ ॥ -अध्याय १६. (३) जरी बोले ऐसे पुराण । तथापि त्यांच्या मुखीं तें अप्रमाण । की ते कल्पितश्रुति करिती निर्माण । त्या वेदपाठकांस पुसतांच उडती ॥२८८ ॥ पुराणें पाठ नसती । त्यांत वेदास गीतेस जी न मिळती। ती अप्रमाणे वाटती । की काडीचोर तो पाडी चोर ॥२८९ ॥ गीता पाठ सर्वत्र । तैशाच वेदांच्या शाखा मात्र । यांत त्यांची वाणी अपवित्र । रिघों न शके ॥ २९० ॥ पुराणे पुस्तकींच असती । त्यांत त्यांच्या कल्पना नाचती। . नवे श्लोक निर्मुनी घालिती । काढिती लोक व्यासाचे ॥२९॥ -अध्याय १७. (४) आतां 'संन्यस्य श्रवणं कुर्यात् ' हे वेदवाणी । तरी तीचा अर्थ वोलतो चक्रपाणी। की, 'काम्य त्याग संन्यास;' आणि गांडीवपाणी । सुभद्रापती श्रोता गृहस्थ ॥ ११७ ॥