पान:वामनपंडित.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. २७ - कित्येक समंजस चिकित्सक लोकांना जबरदस्त शंका आली आहे, त्याप्रमाणे तीच शंका अडीचशे वर्षांपूर्वी वामन पंडितांनाही आली होती. । गीता व वेद हेच कायते प्रामाण्यग्रंथ आहेत असे त्यांचे मत होतें. यांतील प्रमेयांना पुटि देण्यासाठी पाहिजे तर स्मृति व पुराणे यांतील आधार द्यावे. परंतु जर स्मृतिवचनें व पुराणवचनें गीतावचनाशी किंवा वेदवचनाशी विरोध करितील, तर तीच वचने विश्वासास अपात्र, असत्य व त्याज्य म्हणून समजावी, असे त्यांनी आपले मत कोणाचीही भीडमुर्वत न धारेतां स्पष्टपणे नमूद केले आहे. दहाव्या अध्यायांत श्रीकृष्ण हाच परब्रह्म परंधाम होय, हे सिद्ध करीत असतां, पंडित म्हणतात:हे वचन स्वयें त्या अर्जुनाचें, । आणि हे शास्त्र भारत, पंचम वेद नाम ज्याचें। आणि हे जगद्वंद्य उपनिषत्सार साचें । श्रीमद्भगवद्गीता पाठ सर्वत्र लोकांस ॥४८८ तेथे ऐसा निर्णय | आदिदेव जगत्कारण अद्वय । तो हा श्रीकृष्णचि ऐसा निश्चय । इतकियापरी या गीतेंत.॥४८९ इतर पुराणी व्यासवैखरी । सन्मार्गी लावावया अनधिकारी। ज्यास त्यास थोर म्हणे परी । सिद्धान्त ऐसा व्यासाचा.॥ ४९० आणि शंका इतरां पुराणीं । की मतकर्ते आपणास इष्ट तैसी स्ववाणी। पुराणश्लोकी मेळवोनि घाणी । केली सकल पुस्तकांची. ॥ ४९१ पुरातन श्लोक काढिती । स्वकृत श्लोक घालिती। सभेत पुस्तकें कादूनि दाविती । प्रमाणे स्वकल्पितें.॥ ४९२ वेद आणि हे भगवद्गीता । सर्वत्र पाठ पुण्यवंतां । म्हणोनी येथे काढितां घालितां । न फावे कुमत तस्करातें.॥ ४९३ -अध्याय १०. याच गोष्टीचा पंडितांनी पुढे चवदाव्या, सोळाव्या व अठराव्या अध्यायांत अनुवाद केला आहे :(१) गीता पुराणे ये रीतीं । एकवाक्यता पावती। तत्रापि गीता उपदेशी श्रीपती । सार सर्वां उपनिषदांचें.॥२०३