पान:वामनपंडित.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. एवं हठयोगें मरण । तरोनिही, मोक्षाचे कारण। ब्रह्मविद्याच, तीविण । मोक्ष नव्हे. ॥ ९४१ -अध्याय ४. ह्याच मताचा अनुवाद पुढे पंडितांनी अनेक वेळां केला आहे. विशेषतः आठव्या अध्यायांतील २४-२५ व साहाव्या अध्यायांतील १२-१७ या श्लोकांवरील टीका अवश्य वाचण्यासारखी आहे. तेव्हां या निरनिराळ्या वादींच्या अभिमानरोगावर भगवदुक्तीच्या यथार्थमात्रेचे वळसे देऊन त्यांचा भ्रम उतरण्यासाठीच पंडितांनी हे दीपिकारसायन तयार केले. शिवाय कित्येक ज्ञाननिष्ठ भागवतांनाही गीतेवर टीका करितांना कितीएक महत्वाच्या शब्दांचा अर्थ न कळून, त्यांनी त्यांविषयी मुग्धता स्वीकारली आहे किंवा काही तरी लटपटपंची करून वेळ मारून नेली आहे, हीही गोष्ट पंडितांच्या ध्यानात आली होती. उदाहरणार्थ, भगवंतांनी आपला अर्जुनाशी झालेला संवाद वर्णीत असतांना वारंवार 'धर्म्य' पद योजिले आहे. प्रत्याक्षावगमं धर्म्य सुसुखं कर्तुमव्ययम् । ९।२ ये तु धामृतमिदं यथोक्तं पर्युपासते । १५३० अध्येष्यते च य इमं धर्म्य संवादमावयोः। १८१७० तेव्हां पंडित म्हणतात: एवं ऐसें 'धर्म्य' पद । भगवान् बोले प्रतिपद । याचा अर्थ विशद । न बोलती कोणी. ॥ १२८ : निर्धर्म म्हणजे निर्गुण । सधर्भ म्हणजे सगुण । 'धर्म्य' पदें दावी खूण । विश्वात्मज्ञानाची.॥१२९ पुढे होईल विशद । जें जें ठायीं 'धर्म्य' पद । हें मंगलाचरणीं कृष्णपद । स्मरतां आठवे समग्र गीता.॥१३० या कारणे जी भगवंता! । यथास्थित हे तुझी गीता । वाखाणावी म्हणूनि होता । बहुत काळ संकल्प.॥१३१ -अध्याय १. ही ज्याप्रमाणे आपल्या धर्मग्रंथांत लटपट्या ब्राह्मणांनी स्वकृत श्लोकांची भेसळ करून त्या ग्रंथांची घाण करून टाकिली आहे, अशी