पान:वामनपंडित.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. विरुद्ध बोले नारायण । तरी त्याचे वचन केवीं प्रमाण? । त्याची टीका करावयाचेंचि कारण । मग कैचें ? ॥ १९० ज्ञानियापरिस अज्ञ भक्त । थोर म्हणणें तो सर्वथा अयुक्त । यालागी 'योगवेत्ते अधिक कोण' हे अर्जुनोक्त । वचन ज्ञानयोग दोही पक्षांचा सूचवी हे सत्य.॥ १९५ -अध्याय १२. ज्ञानहीन भक्तीने पुण्य संग्रहीं पडून, त्याचे फल में सुख तें प्राप्त होईल. परंतु पुण्य सरतांच पुन्हां 'ये रे माझ्या मागल्या' असा प्रकार सुरू होणार. ज्ञानहीन भक्तीने अढळ मोक्षपद मिळणार नाही; तत्प्राप्तीस्तव अद्वैतज्ञान व सगुणभक्ती यांचा मिलाफ झाला पाहिजे. यावरून पंडितांचा भागवतधर्म व पंढरीच्या वारकऱ्यांचा भागवतधर्म यांतील भेद लक्ष्यात येईल. निव्वळ भक्ती ही ब्रह्मीभूत होण्याचा मार्ग नव्हे. ज्ञानावांचून भक्ति पंगू होय अशी भगवद्वाणी आहे. हठयोगादिकांनीही मुक्तिलाभ होऊ शकत नाही, असें पंडितांचे मत । असे. ज्ञानावांचून व भक्तीवांचून हठयोग फुकट आहे. ज्ञानावांचूनि मोक्ष नसे । सर्व वेद म्हणती ऐसें । अविद्या आवरण असोनि कैसे । हठयोगी मोक्ष पावती? ॥ ९२९ हठयोगियांचे अमृतत्व । तो मोक्ष नव्हे, जाणावें अमरत्व । वेदांतियाचे बोलणे तत्त्व । अमृतत्त्वशब्दें. ॥ ९३० आतां हठयोगी मृत्यूपासुनी सुटती । ज्ञानयोगी मुक्ति पावती। ऐसें बोलतां, न तुटती। विवाद अन्योन्य. ॥ ९३१ 'सुटले मृत्यूपासोनी । ते मुक्त झालेच' म्हणोनी । ऐसा श्रुतीचा आश्रय करोनी । स्वमत स्थापिती पुन्हाही योगी.॥९३२ या कारणे श्रुती । विद्या अविद्या दोहींच्या गती। एकाच पुरुषाच्या वर्णितां तोडिती । वाद दोही मतांचा. ॥ ९३३ की विद्या एक, अविद्या एक । दोन्ही जाणे जो साधक । अविद्येने तरूनि मृत्यूचा पंक । विधेने अमृतत्व अनुभवी. ॥ ९३४ एवं मृत्यू तरला तरी कांहीं । मोक्ष तोपर्यंत नाहीं। " की ब्रह्मविद्येने नरदेहीं । जो स्वरूप नाही ओळखिलें. ॥ ९३५