पान:वामनपंडित.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. अमर झाले अमर । तरी पीती अमृत सादर । न सांगतांही हा प्रकार । जीवन्मुक्त करितील.॥ १०१ सगुणाची अद्वैतभक्ति । करितां, पूर्वील विषयविरक्ति । दृढ होतां, होय मुक्ति । हे शब्दज्ञानी नेणती. ॥ १०६ पिसाटाच्या करी कोलित । तैसे त्यांस शास्त्रसंमत । परी त्यांचा अंतरंगसिद्धांत । न कळे त्यांला. ॥ १०७ पशंस पाजावया पाणी । वडिली कूप खारवणी । केला, म्हणोनी गोडवणी । न प्यावे काय?॥ १०८ असो ते प्रस्तुत शास्त्रवाणी । ऐशी अजी चक्रपाणी!। परी मी न पी तें क्षार पाणी । वडिलीं केलें म्हणोनी. ॥ १०९ भवमातें छेदी शस्त्र । ऐसें तुझें गीताशास्त्र ।। त्याची दाविती पाठमात्र । धार लपविती ये रीती.॥ ११० खड्यास मुख्य पाणी । तैशी भक्तिपर तुझी वाणी । गीतेच्या अंती चक्रपाणी! । ऐसेंचि बोललासी. ॥ १११. -अध्याय १ ला. ज्ञानयुक्त सगुणभक्तीचा द्वेष करणाऱ्या व भगवद्वचनें पिळून स्वतःला अनुकूल असा अर्थ त्यांतून गाळू पाहणाऱ्या निर्गुणाभिमान्यांवर पंडि. तांनी जेथे तेथे अशा त-हेचे कोरडे ओढले आहेत. उदाहरणार्थ ११।१०२९-५३; ११।११३८-४४; १२।९६-२२५, ९।६७३-८३; ४।१७६-८७; १२।२६७-७२; १२।१८००-१८४१; १८१२८७० -२९९२; १८।३०४३-३०४५, ४।४००-४०६, ३।५०१-६; इत्यादि स्थळे पहावी. भगवद्गीतेंत ज्ञानयुक्त भक्तीचे गौरव अथपासून इतीपर्यंत आहे, असें पंडित वारंवार कंठरवाने सांगत आहेत. (१) आणि भगवंता! तुझें मत । की निर्गुणात्मक अद्वैत । कळोनि माझे चरणीं रत । भक्त सकळांत तो थोर. ॥ ७६ -अध्याय १ ला. (२) एवंच समग्र गीताशास्त्र । नव्हे सगुणभक्तिहीनाचे व्याख्यान पात्र1 हाचि एक अध्यायमात्र । काय नव्हे म्हणावा? ॥ १७८४