पान:वामनपंडित.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ श्रीसरस्वतीमंदिर. दीपिकेचा अवतार झाला. पंडितांचा निर्गुणवाद्यांवर फारच कटाक्ष होता. एकदा अद्वैत कळून निर्गुण साक्षात्कार झाल्यावर सगुणभक्तीचें प्रयोजनच नाही, हे निर्गुणवाद्यांचे प्रमेय, व ते स्वमतानुसार गीतावचनांचा अर्थ लावीत. यावर पंडित इतकेच म्हणतात की, ज्याला रुचल व साधेल त्याने केवळ निर्गुणचिंतनाने मोक्ष गांठावा, परंतु गीतेंत जेथे तेथे सगुणभक्तीच उपदेशिली आहे. तेव्हां निर्गुणवाद्यांनी भगवद्वचनांचा विपर्यास करून आपल्या मतांचे मंडण करण्याच्या भरीस पडूं नये. निर्गुणचिंतनापेक्षा ज्ञानयुक्त सगुणभक्ति हाच मोक्षसाधानाचा सोपा व अधिक श्रेयस्कर मार्ग आहे. निर्गुणज्ञानाचे सगुणभक्तीने दृढीकरण करावे असे गीता म्हणते. चार्वाकाचें नास्तिक मत खोडून काढण्यासाठी गौतमानें तर्कशास्त्र काढले. पण निर्गुणवाद्यांनी त्या तर्कशास्त्राचा आश्रय करून ज्ञानयुक्त सगुणभक्तीवर प्रहार करणे अत्यंत अश्लाघ्य आहे. वस्तुतः गौतमाचे सिद्धान्त व अद्वैत यांत फरक नाही, आणि अद्वैताला सगुणभक्तीने बाध येत नाही, इतकेच नव्हे, तर त्यास उलट दृढता येते:दुःख बीजे एकवीस । गौतम म्हणे त्यांचा ध्वंस । तोचि मोक्ष, तरी हे परमहंस । अद्वैतानुभवीही मानिती.॥ ८७ जीवांस अखंड ब्रह्मत्व । ब्रह्मचि मोक्षसुख हे तत्व । दुःखनाशें मुक्तत्व । अद्वैतसिद्धांतही ऐसा.॥ ८८ एवं अंतरी अद्वैत । बहिरंग कार्यार्थ धरिलें द्वैत । अगत्य वेद विरुद्ध मत । खंडावया. ॥ ८९ परी हे नेणती लोक । गोड वाटती गौतमतर्क । म्हणुनी ते अद्वैतार्क । न पाहती, झाले दिवांध. ॥ ९० कळलियाही निर्गुण । मागुती भजावा सगुण । ऐसें बोलतां ते तर्कनिपुण । हांसती शास्त्रासी.॥ ९२ आतां सांगावें त्यांस सार । की कळलें जरी निर्विकार । तरी मन झाले पाहिजे तदाकार ! या निमित्ते सेव्य गुरुदेव. ॥ ९४ साखरेच्या औषधी । रोगनिहत्तीचीच अवधी। गोड म्हणूनी निरोगीही कधी । न सोडी साकर ॥१०० ।