पान:वामनपंडित.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. तील पुढील लांब उतारा, फारच महत्त्वाचा असल्यामुळे, तो संबंध सादर करितो.: जी जी देवाधिदेवा!। प्राकृत भाषेकरितां तुझी सेवा । वेदवाणीस उपजे हेवा । तुझ्या स्वरूपाचा ठेवा जीमाजी. ॥ १० मुख्य तुझें नाम गोड । मुखी सर्व भाषांचें कोड,। जें कानी मुखीं येतां, मोड । देहीं उपजती प्रेमाचे! ॥ ११ काय वेदशास्त्र जाणे व्रज? । त्याची भक्ति देखोनि, आत्मज । ब्रह्मा वेदवक्ता शिरी पदरज । वंदी वजनारीजनाचें! ॥ १२ गजेन्द्र कोण शास्त्र पढला! । बाळ कोण्या पांडित्ये ध्रुवपदा चढला? दासी कुब्जा तिला घडला । काय अभ्यास संस्कृताचा? ॥ १३ वजीं चारितां गायी । कुचकुंकुमें गोपिकांची पायीं। तदंकित म्हणे कृतार्थ ठायीठायीं,। बल्लवस्त्रिया पढलिया त्या काय?॥१४ अभिमाने बुडाले पंडित, । यज्ञपल्यांनी अर्चितां वैकुंठमंडित । न पढतां, न वाचितां अखंडित । आनंद भक्तीने पावल्या. ॥ ११ भाक्त थोर, भक्ति थोर; । तूं चंद्रमा, भक्त चकोर;। भक्त मयूर, मेघश्याम समोर । त्यांस तूं सर्वत्रही. ॥ १६ एवं पावावया तुझे चरण, । भाषा कोणी नव्हे कारण। कारण सप्रेम अंतःकरण । देवाधिदेवा! ॥ १७ जैसे भजनास कारण नव्हे वित्त, । मुख्य सादर असावें चित्त, । तथापि वित्तवंत वेंचिती यानिमित्त, । की अन्यथा वित्तशाम्य ___ लागेल. ॥ १८ मंगलाचरण म्हणोनी । करितों देवा! संस्कृतेंकरोनी। कोणी अर्थी दृष्टीही नेदुनी । सुखें उगेचि वाचोत. ॥ १९ जेथोनि टीकेचा आरंभ । तेथोनि गीतार्थ तो स्वयंभ । तो होय अत्यंत सुलभ । शब्द ऐसे योजितो. ॥ २० -अध्याय ९. यथार्थदीपिका रचण्याचा हेतु पंडितांनी पहिल्या अध्यायांत स्पष्ट ) सांगितला आहे. निरनिराळे मतवादी आपापल्या मतांस अनुकूल असा गीतेचा अर्थ करीत असत; त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊन सर्वच चुथडा झाला होता तो मोडून, गीतेचा खरा अर्थ प्रकट करण्याकरितां या