पान:वामनपंडित.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. रामदास स्वामींकडे देण्यात येते. या दंतकथांविषयी अनेक शंका घेण्यासारख्या आहत. पण त्यांविषयों पुढे विस्तृतपणे विचार करण्यात येणार आहे, तेव्हां येथे इतकेंच सांगतों को, मराठीचे कटे अभिमानी जे मोरोपंत यांचीसुद्धां संस्कृत कृाते पंडितांच्या संस्कृत कृतीपेक्षा अधिक आहे. पंडितांचे एक दोनच संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहेत, परंतु त्यांत त्यांनी संस्कृताविषयी आव्यता किंवा प्राकृताविषयों तिरस्कार प्रकट केलेला आढळत नाही. पंडित द्वैतमार्गी होते,असेंही त्यांच्या ग्रंथांवरून आढळून येत नाही; उलट द्वैतवादाने समाधान होत नाही, म्हणून आपण अनेक गुरू केले, अद्वैततत्त्वाचा अनुभवयुक्त बोध व्हावा म्हणून अनेक संस्कृत व प्राकृत ग्रंथांचे परिशीलन केलें, पण सर्व निष्फळ गेलें ; अखेर मलयपर्वतावर सच्चिदानंदयतिरूपाने भट देऊन, ईश्वराने उपदेश केला, तेव्हांच समा. धान झाले व अद्वैत आणि सगुणभक्ति यांचे खरें खरें ज्ञान प्रत्ययास आले, असें पंडितांनीच आपल्या एका * संस्कृत ग्रथांत स्पष्ट सांगितले आहे. रामदासस्वामींचा पंडितांनी कोणत्याही ग्रंथांत उल्लेख केला नाही ; निदान अद्वैतरहस्य व सगुणभक्ति यांचा उपदेश समर्थाकडून झाला असता, तर त्याचा उल्लेख न करितां, सच्चिदानंद यतीचः बनावट काहणी सांगण्याइतका अधमपणा पंडितांच्या अंगी होता, असे आमचें मन मानूं शकत नाही; पंडितांना षट्शास्त्रे व अठरा पुराणे केवळ हातचा मळ होती; तरी पण ते महान् भगवद्भक्त होते. भगवद्भजनाला कोणतीही भाषा चालते, संस्कृतांतच कांहीं जास्त आहे असे नाही, असेंच वामनपंडितांचे मत होते. पंडितजन अभिमानाने व दुराग्रहाने बुडाले आहेत, असे ते स्पष्ट म्हणतात. गीतेवरील टीकेंत अगदी सुलभ शब्द वापरावयाचे, अर्थ स्पष्ट करावयाचा, अगडबंब संस्कृत शब्द किंवा समास योजावयाचे नाहीत, हा पंडितांचा बाणाच होता, व तो त्यांनी अगदी कसोशीने पाळला आहे. जे जे म्हणून भगवद्भक्त होते, त्यां त्यांविषयों पंडितांना फार फार आदर व अभिमान वाटत असे. बरोबरच आहे, भक्तीपुढे संस्कृत व प्राकृत यांमधील भेदभाव कोठें टिकणार? यांसंबंधाने यथार्थदीपिके* अनुभूतिलेश, श्लोक १-२, १३३-१४९, ३२४-३२५ पहा.