पान:वामनपंडित.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपांडत. की प्रारब्धं सुख आणि दुःखही । जीवन्मुक्त जाला त-ही सुटणार or नाही, परि भोगितां, ‘सुख हो आणि दुःख न हो' ऐसें कांहीं। न म्हणे, समदुःखसुख ये रीतीं ॥१४५२ भोगकाळी मीपण । वाटे हा पूर्व कर्माचा गुण । की मी कर्ता ऐसें अहंस्फुरण । अज्ञदर्शत होतें जन्मांतरी कर्म दारा करितां. ॥ १४५३ वारा राहिला विशाळ । परि वृक्षाचें हालणे न राहे तत्काळ । अहंता गेली तरी भोगकाळ । दावी अहंकार आहेसा. ॥ १४५८ जें ऐसें भोगी अहंस्फुरण ! त्यास नाशक समपण । तो भोगातीतचि आपण । जो सुखदुःखीं सम ऐसा. ॥ १४५९ ज्वरादि अदृष्टकृत । तें भलता सोसी चावूनि दांत । हा ज्ञानी विवेकी अत्यंत । घाबिरा नव्हे, नवल नाही. ॥ १४८२ परंतु परकृत । दुःख वाटतां अत्यंत । क्रोध उपजे निश्चित । समदुःखसमता मग कैंची ? १४८३ म्हणूनि म्हणे जगाचा स्वामी । अगा! अर्जुना! तो क्षमी। क्षमा ऐसी की, “सर्वही आत्माच मी । क्रोध कोणावरी करूं?” म्हणे. ॥ १४८४ एका हातें मक्षिका मारी । तो करतळ बळे. लागे गालावरी,। तो दंड जरी हातांतें करी, तरी ज्ञानी कवणावरी क्रुद्ध होय?॥१४८५ आपला दांत आपली जिव्हा रगडी, । दुःख वाटे तरी काय दांत पाडी?। ज्यास सर्वाभूती आत्मत्वाची आवडी । क्रोध कोणावरी करील तो? ॥१४८६ -यथार्थदीपिका. पंडितांना आपल्या ज्ञानाची व पांडित्याची घमेंड होती; दुसऱ्याची अवहेलना करण्यांतच ते पुरुषार्थ मानीत; ते द्वैतवादी होते; संस्कृत भाषाच कायती बोलायची व लिहायची, पण मराठी म्हणजे केवळ ।। अस्पर्यच असे त्यांना वाटत असे; त्यांचे संस्कृत ग्रंथ पुष्कळच आहेत; वगैरे अनेक दंतकथा या महापंडिताविषयी लोकांत प्रचलित आहेत. पंडितांना द्वैतमागांतून परावृत्त करून, अद्वैताकडे व भक्तियोगाकडे वळविण्याचे आणि यांजकडून प्राकृतजनोद्धारार्थ प्राकृत रचना करविण्याचे श्रेय