पान:वामनपंडित.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. कोणी वाईटसा वाटे । तरी मन धांवे द्वेषाचिया वाटे। सर्वत्र भगवद्भाव पोटी वाटे । द्वेष कोठे तया उपजेल? ॥१४०६ आत्मा आपला नित्य प्रिय । तोचि सर्वभूतें जाला अद्वय । तो कोणासही जरी वाटता अप्रिय । तरी ज्ञानियास द्वेष कोठे तरी उपजता. ॥ १४०६ भगवद्प सर्व सृष्टी । ध्यान करितां बिंबली दृष्टी । सर्वात्मकत्वी ज्यांस तुष्टी । ते द्वेष करिती कोणाचा? ॥१४०७. गूळ आवडे ज्याला । त्यास नावडे कोण भेला? । चाखतां जो तो जिभेला । गोडचि लागे.॥१४०८ ज्यास पाहिजे सुवर्ण । त्याज्य त्यास नग कवण? | जिव्हस उदकपण । न वाटे कोणे गारेनें? ॥१४०९ अमृतसिंधूची लहरी । कोणती अमर न करी । ज्यास आत्मा उघडा चराचरीं । तो द्वेष करील कोणाचा?॥१४२० की द्वेषवर्जित सर्वत्र । त्यांत मोक्षाधिकारियांचा मैत्र । उरली भूते ती कृपापात्र । भगवद्भावेंकरूनी ॥ १४१४ जो मोक्षाधिकारी । त्यास संसारसागरी तारी। मित्रत्व त्यासारखें कोण करी? । म्हणूनी मैत्र वाटे मुमुक्षुते॥१४१५ यास सर्व सम । की शत्रु, मित्र दोघेही पुरुषोत्तम । परंतु ज्याला तारी, त्यास परम । मित्रत्व वाटते तयातें.॥१४१६ काया वाचा मानसा । सर्वभूती जगनिवासा। संतुष्ट करी ऐसा । करुण अत्यंत. ॥१४१८ ॥ हे माझें म्हणोनी । जो स्त्रीपुत्रादि आपुली मानी। त्यावेगळी चराचरें भूतें त्रिभुवनीं । पारकी

वाटती तयाला ॥१४२० स्त्री एक अथवा पुत्र । आपली म्हणतां इतकीच मात्र । भूतसृष्टि अवधी विचित्र । ईश्वरासहित पारखी ॥१४२१

ओंगळ ऐसी ममता । मूळ तीस ही अहंता । ज्या अहंतेने आत्मया अनंता। मानी सात विती शरीरमात्र.१४२२ म्हणतां मी एक देह, । उद्भवे देहसंबंधियांचा स्नेह, । माझी स्त्री, माझा पुत्र, माझें गेह, । म्हणूनि रंगी रंगे तयांच्या१४२३ स्यास पारखें विश्व सकळ । जो अहंते-ममतेने व्याकुळ;। जो या दोंवेगळा निर्मळ । अद्वेष्टा मैत्र करुण तोचि भूतमात्रीं ॥१४२४