पान:वामनपंडित.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. तें हेच आहे. परंतु पंडितांना काव्य रचावयाचे नव्हते, किंवा केवळ कल्पनागम्य गोष्टींनी वाचकांना भ्रमवून त्यांचे चित्तरंजन करावयाचे नव्हतें. हाच पंडित व ज्ञानेश्वर यांतील मुख्य भेद आहे. भावार्थदीपिका काव्यमय आहे, तर यथार्थदीपिका ज्ञानमय आहे. एकीचा विहार जर उच्च व विरळ वातावरणांत, तर दुसरीचा सखल व घन वातावरणांत; एक पदार्थांस अस्पष्ट पण मोहक रंग देणारी चंद्रिका, तर दुसरी प्रत्येक पदार्थ स्पष्ट व वास्तवस्वरूपाने प्रकट करणारी रविप्रभा; पहिली मनाला. चकित करिते, तर दुसरी त्यास शहाणे करिते; पहिलीने मनाला चमत्कार वाटतो, तर दुसरीने त्याला समाधान प्राप्त होते. पुढील उतारे वाचले म्हणजे वरील विवेचनाचा वाचकांस प्रत्यय येईल अशी उमेद आहे:-- अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ -गीता, अ. १२ श्लोक १३. जो सर्व भूतांच्या ठायीं । द्वेषातें नेणेचि कांहीं ॥ आपपर नाहीं । चैतन्या जैसा. ॥ १४४ उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे । हे कांहींच नेणिजे । वसुधा जेवीं. ॥ १४९ का रायाचें देह चाळू । रंका परौतें गाळू हे न म्हणेचि कृपाळू । प्राण मैं गा!॥ १४६ गाईची तृषा हरूं । व्याघ्रा विष होऊन मारूं । ऐसें नेणेचि गा करूं । तोय जैसें. ॥ १६७ तैसी आघवियांची भूतमात्रीं । एकपणे जया मैत्री । कृपेसी धात्री । आपण जो. ॥१४८ आणि 'मी' हे भाष नेणे । माझें कांहींच न म्हणे । सुख दुःख जाणणें । नाहीं जया. ॥१४९ तेवींचि क्षमेलागी । पृथ्वीसि पवाड अंगीं। संतोषा उत्संगी । दिधलें घर. ॥ १५० -भावार्थदीपिका. अगा! सर्व भूती तया । द्वेष नाहीं धनंजया!। . शांति सर्वात्मक ध्यानी जया । द्वेष कोठे तया उपजेल? ॥ १४०४