पान:वामनपंडित.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वमिंदिर. काव्यस्फूर्तीला पूर्ण वाव न देतां, अनेक वेळां त्यांना शब्दार्थावरच मल्लिनाथी करावी लागली आहे, यास त्यांचा नाइलाज होता. गीतेवर टीका करावयाची म्हणजे काही नुसते कानाला व मनाला गोड लागेल असें काव्य निर्माण करायचे नाही. काव्यदृष्टीने एकादी टीका कितीही गोड असली, तरी जर ती भगवदुक्तीचा यथार्थ आशय प्रकट करीत नसेल, तर ती पंडित टाकावूच ठरवितात. ऐकायला अत्यंत गोड व रसाळ, पण भगवदुक्तींच्या संदर्भाशी विसंगत असा अर्थ करणाऱ्या किंवा अनुचित 'दृष्टान्तांनी त्यांची फोड करणाऱ्या टीकांविषयी पंडित एके ठिकाणी म्हणतातभगवंत म्हणा वेडा । अथवा त्या टीकेची श्रद्धा सोडा । गीता सोडोनी व्यर्थ पवाडा। गोष्टींचा वाचणे, तरी वाचा गोड गोष्ट६५४ गीता जाते पश्चिमेकडे । टीका चढे पूर्व दिशा पर्वताचे कडे । दोहीस हात लाविती बापुडे । अर्थ सांपडे केवि तयां? ॥ ६५५ ॥ -अध्याय ९ मनोरंजनार्थ सुंदर काव्य करण्याचा यथार्थदीपिकाकारांचा हेतुच. मिव्हता. भगवदुक्तीचा खरा खरा अर्थ लोकांना अगदी स्पष्ट करून सांगण्याचंच त्यांनी कांकण बांधल्यामुळे, त्यांनी कल्पनेच्या उड्यांना फारसा वाव दिलेला नाही. प्रत्येक दृष्टान्त, रूपक, उपमा, ही केवळ अर्थ व्यक्त करण्याच्याच उद्देशाने योजिली असल्यामुळे, पंडितांनी त्यांची अगदीं फोड करून टाकिली आहे. कोणतीही गोष्ट जराशी गुलदस्तांत लेखन वाचकांच्या कल्पनाशक्तीस वावरण्यास बिंदुमात्रही जागा ठेविलेली नाही. नेहमी अनुभवास येणाऱ्या गोष्टी व मूर्तपदार्थ यांविषयींच सर्व दृष्टान्त वगैरे आहेत. केवळ कल्पनागम्य, अमूर्त किंवा अपरिचित उपमादृष्टान्तादिकांनी वाचकांच्या मनोवृत्त व जिज्ञासा या चाळविल्या जातात व ग्रंथांत एक प्रकारची विलक्षण जादू उत्पन्न होते. केवळ आभासानेच मन आनंदांत पोहूं लागते. पण जादूगाराच्या खेळांत जशी प्रेक्षकांची, तशीच अशा त-हेच्या मनमोहन ग्रंथांत वाचकांची कल्पना स्वैर भरारूं लागते व यथार्थज्ञानाला वारंवार एक प्रकारची संदिग्धता व भ्रामकता यऊ लागते. काव्याचे जीवन व मर्म