पान:वामनपंडित.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चामनपंडित. ज्या ज्या नामाचा प्रताप । निववी नाशुनी तिन्ही ताप। तो संतांचा मायबाप । प्राकृत सखा म्यां मानिला. ।। ७६९ अमृत माननि पाणी । मूढ शिंपी आंगणीं । अनादि सखा चक्रपाणी । प्राकृत सखा मानिला! ॥ ७७२ प्राकृत सखा मानुनी । 'अरे कृष्णा! अरे यादवा!' म्हणोनि । 'अरे सख्या! अरे गड्या!' ये रीती करोनी । वेडें वांकुडेंही मी वदलों. ॥ ७७३॥ -अध्याय ११. (१०) प्रारब्धाशी करी हट । तो वायांच जाय निपट । की ईश्वरशक्तीकरून उत्कट । बळ प्रबळ प्रारब्धाचें ॥२२६१ ॥ तीन प्रवाही पडे । पोहणार पोहे प्रवाहाचकडे । तरी तो पोहणार न बुडे । हळूहळू लागे तीरातें. ॥ २२६३ ॥ जो पोहे उफराटा । त्याच्या तोंडात भरती लाटा। जरी पोहणार मोठा धाटा । होय कष्टी बहु फार ॥ २२६४ ॥ मग ते पोहणेही विसरे । जेव्हां पोटी पाणी शिरे। तैसा ज्ञाना अनुभवी विसरे । हटें प्रारब्धासी मोडतां ॥ २२६५ ।। राजाज्ञा वंदी शिरीं । त्याचमध्ये पोटभरी ! तो सुखी अन्यथा वर्ते तरी । थितें जीवित्व अंतरे. ॥ २२६६ ।। - -अध्याय १८. इतके उतारे पुरे झाले. या व पुढे प्रसंगोपात्त येणाऱ्या उताऱ्यांवरून पंडितांच्या भाषाशैलीविषयी आम्ही जे वर लिहिले आहे त्याची सत्यता वाचकांच्या अनुभवाला येईल. पंडितांची चतुरस्रता, जबर निरीक्षणशक्ति, व्यवहारज्ञान, विशाल अनुभव हीही यांत बिंवली आहेत. वसंताच्या अमदानीत उद्यानभूमीमध्ये झाडांवर शोभणाऱ्या फुलांचे घोंस व त्यांखाली पसरलेला फुलांचा पेर ज्याप्रमाणे अत्यंत मोहक वाटतो, तद्वत् यथार्थदीपिकेंत इतस्ततः पसरलेले अशा प्रकारचे उत्कृष्ट रचनेचे शेकडों नमुने मनाला अगदी दंग/ करून टाकतात. तरी पण हे लक्ष्यात ठेविले पाहिजे की, दीपिका रच-) ण्यांत पंडितांचा हेतु काव्य निष्पन्न करण्याचा नव्हता, तर भगवद्गीतेच खरा खरा अर्थ प्रकट करून, लोकांना ज्ञानयुक्त भक्तीचा मार्ग निभ्रांत रीतीने दाखवावयाचा होता. तेव्हां हा आद्य हेतु असल्यामुळे आपल्या