पान:वामनपंडित.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. प्रसूत नाहीं तोचि चिमणी । आंडियांकारणें गर्भिणी। कापूस आणि मृदुतृणीं । सज करी. ॥ २८४ ॥ चारा सांडूनि, वेंची। कापूस, धरधरोनि चोची। ने ऐसी चिंता संतानाची । करी, जो उपजली ती ...: ... नसती. ॥ २८५ ।। ऐसा पाहतां विचार । पशुपक्षियां समान विहार । निद्रा, मैथुन, आहार, । पशंस तैसे मनुष्यांसही. ॥ २८६ ॥ . एवं भजन सर्वेश्वराचें । करिती, त्यांचे मनुष्यत्व साचें। म्हणूनि वाक्य भगवंताचें । की, 'माझ्या मार्गी वर्तती मनुष्यं सर्व'॥ २८७ ॥ .... . -अध्याय ४. (८) पुत्र जाला तरुण । तो बरा जाणे पित्याचे गुण;। बाळ नेणे, म्हणूनि करुण | काय उणे पाहे तयातें ? ॥ १६०० भक्त अपक्व असला जरी । पक्कापरिस ओझें त्याचें मजवरी। त्याची सर्व चिंता ती श्रीहरी । अगा! अर्जुना करितसे . ॥१६०१ जो पक्वचि जाला, । म्यां काय संभाळावें तयाला?। क्षणमात्र न स्कुरे जयाला । द्वैत कांही. ॥ १६०२ पक्षहीन बाळ । पक्षी त्याचाच करिती संभाळ । देखोनि त्याचा परिपक्वकाळ । निश्चिंत असती. ॥ १६०३ -अध्याय १२. (९) “तूं कृष्ण सखा आपला । देवा! इतुकेंच ठावुकें मला । हा तुझा महिमा नाही कळला । मानिला सखाचि म्हणोनी.॥७६२ मर्कट मुक्ताफळे नेणे । दांतें रगडी माननि चणे । तैसा मी" अर्जुन म्हणे, I “सखा मानुनी बोलिलों तुजसी.॥७६३ कल्पदृक्षाचा नागर । करूं पाहे हलधर । म्यां मानिला तूं सर्वेश्वर । सखा प्राकृतपुरुषदृष्टीनें. ॥ ७६४ न कळतां परिसाचा गुण | टांक आठरा भार खूण | जोख पाव शेर मानूनि, लवण । विकू लागला भारतयाच्या॥७६५ . कामधेनुचिया कांसे । गोचीड आवडी तृप्ति होतसे । ' तेचि उपमा मज दिसे । सुख पावलों सखा प्राकृत मानुनी. ॥७६६ दांडगियास चिंतामणी । सांपडला तो घालून गोफणीं।... शेत संरक्षी, तसा मी चक्रपाणी । प्राकृत सखा मानिला! ॥७६७ ।