पान:वामनपंडित.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. (४) अर्जुना! जरी संन्यासी । डोई बोडोनि झालासी। तरी कैसा कर्मे टाकिसी । क्षण एकही. ॥ ८० लंगोटीही टाकणें । आणि नग्न होऊनि असणे । तेंही नव्हे काय करणें । अगा! कर्म? ॥ ८१ घट वर्ते तरीच माती । न वर्ततां काय अन्य जाती? । कर्मे रचिली देहाकृती । त्याग कर्माचा तो कैसा? ॥ ८३ ।। भूचर टाकोनि भूमी । म्हणे पळोनि जाईन मी। पळतां पुढे रिकामी । भूमीच दिसे ! ॥ ८४ ॥ गगन टाकोनि पक्षी । उडॉ लागला अंतरिक्षीं । तो तो सर्वत्र लक्षी । तेंचि गगन! ॥८६॥ -अध्याय ३. (५) जे जग अनेकरूप पूर्वी देखिलें । तेंच हें ऐसें अर्जुने लेखिलें । परित्या एक शरीरी देखे रेखिलें। चित्र नवनारीगजाचे जे रीतीं।। २४१ पाहतां गजाच्या आकाराकडे। गज सारा दृष्टीं पडे। त्यांतचि पाहतां सांपडे । स्थळस्थळी भिन्न स्त्रीरूप. ॥ २४२ ॥ -अध्याय ११. (६) नदीजळी नदीतीर । प्रतिबिंबे; परंतु तेचि नीर। तीर बुडवून जेव्हां धरी पसर । प्रतिबिंब जळी तीराचें दिसेना. ॥ ६२७ ॥ ते स्वयें तीरींचे कडेच दिसती जळीं । तेव्हां प्रतिबिंब त्याचे जळी न डळमळी । तैसे चित्प्रतिबिंब निर्मळी । सत्त्वी समाधींत गवसेना.॥६२८॥ -अध्याय १२. (७) द्विपदत्वें मनुष्य होय । तरी पक्षियासही दोनच पाय । दादीनें मनुष्य होय तरी काय । दादी नसे बोकडासी? २८० ॥ आहेत हात यावरूनी । म्हणावें मनुष्य म्हणूनी । तरी मर्कटासही दोनीदोनी । असती हस्त. ॥ २८१ ॥ सुरतसुखें म्हणावें नर । तरी ते सुख पावती वानर खर । मनुष्य निर्मिती म्हणावें घर । तरी पक्षीही गृह निर्मिती.॥२८२॥ पुढील चिंता कोणासी । नसे, ती एक मनुष्यासी,।। या गुणे म्हणावें मनुष्यत्व यासी, । तरी पक्षियासही ते असे ॥२८३॥ LAL