पान:वामनपंडित.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतमिदिर. देता येतील, परंतु तसे करण्यास या चिमुकल्या निबंधात फारसा अवकाश नाही. तरी पण वाचकांच्या समाधानार्थ येथे थोडेसे उतारे देतो:(१) ते निर्गुणोपासकही शहाणे बरे, । स्वहित तत्परचि खरे;। परंतु आत्मा कळतांचि भरे । आंगी वारें जाणिवेचें ॥ २६७ ज्या गांवीं सुख अत्यंत । तो दृष्टी दिसों लागला निश्चित । परंतु मार्गी आडपर्वत । वाट दाखविणार तेथे सोडिला ॥ २६८ दृष्टी गांव दिसतो नीट, । आतां काय दाखवावी येणे वाट? । म्हणोनी साधनाचे कडे अचाट । शरीरवळे वेघों आरंभिले ॥ २६९ नदीचे पैल थडी । दृष्टी देखतां वाटते नदी थोडी,। नाव सांडून टाकिली उडी । आवर्तशत प्रवाहांत ॥ २७० तैसे कळतांचि निर्गुण, ! आतां नलगे म्हणती सगुण;। आपणातें माननि निपुण, । करिती अभ्यास योगाचा ! २७१ -अध्याय १२. (२)जो स्वात्मसुखातें जाणे । आणि ध्याने स्वसुख ज्यास वाणे । त्यातें म्हणती तत्वज्ञ शहाणे । की बाह्यसुखस्पृहा त्याला का असेना ॥ १३०२ स्वयें जो अमृत प्याला । कांजी का आठवेल त्याला? । स्वानंदसिंहासनारूढ झाला । तो भिकेची खापरें कां स्मरेल ? ॥१३०३ जो खेळे गंगाजळीं । तो कां सूर्यकिरणे तळमळी। ध्याननिष्ठाच्या मनी नसे उकळी । विषयसुखस्पृहेची ॥१३०४ -अध्याय १२. (३) जैसी राजपत्नी नवोढा मनोरमा । मातृमुखं जाणोनि भर्तृमहिमा । बैसोनि अंकीही परमा । जाऊंच पाहे उठोनी.॥ ४२१ जो जो वाढे सलगी । तो तो अधिक थारे पलंगी,। गोडी घेतां अंगसंगीं । ढकलली तरी ढकलेना ! ॥ ४२२ तैसें चित्त घडीघडी । अभ्यासी घे स्वरूपाची गोडी। स्थिरत्व वाणतां न सोडी । अनुभव तो आनंदाचा.॥ ४२३ -अध्याय.