पान:वामनपंडित.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामन पंडित. ११ प्रफुल्लित झालेली भासते.* जागोजाग ‘हातच्या कांकणास आरसा;' 'काडीचोर तो पाडी चोर'; 'पोट दुखणे;' 'आपलेच दांत, आपलेच ओंठ;' 'अंगांत वारे भरणे;' 'दांत चावणे;' 'पिशाचाचे हाती कोलित; 'वारा मुठीत धरणे;' 'लेकराचे खेळ;' 'नख लागे ज्याला, कां कुन्हाडी हाणणे त्याला;' 'चोराचे मनी चांदणे' 'कोंडा कांडणे' 'खाऊं मागणे' 'ज्या मापाने घ्यावे, त्याच मापाने फेडावें,' 'मनाचा घोडा' अशासारख्या म्हणी व लौकिक शब्दसमूह यांचा प्रसंगानुसार उपयोग करून, पंडितांनी आपल्या वाणीला साधे पण मोहक स्वरूप आणिले आहे. सरस दृष्टान्त, उपमा व रूपके यांच्या साह्याने गहन विषयही साँस सुगम केले आहेत आतां ज्या ठिकाणी गीतेंतील श्लोकाचा खरा अर्थ न समजल्यामुळे दपटशाही करून इतर टीकाकारांनी कशी तरी वेळ मारून नेली आहे, किंवा भगवद्वाक्यांचा अर्थविपर्यासही झाला आहे, असें पंडितांना वाटले, त्या ठिकाणी अर्थात् एक एक शब्द घेऊन त्यावर मल्लिनाथी करणे त्यांना भागच पडले आहे. परंतु इतर ठिकाणी अद्वैताचे प्रतिपादन करितांना, सगुणभक्तीची महती गातांना, भगवंताला आळवीत असतांना किंवा अशा त-हेच्या मनाला उमळवून टाकणाऱ्या इतर प्रसंगांचे वर्णन. करीत असतांना पंडितांची वाणी ईश्वरी प्रसादाने विकसलेली व काव्यप्रतिभेने अगदी रसरसलेली आढळते. या विधानांच्या समर्थनार्थ यथार्थदीपिकेंतून शेकडों उतारे

  • वर. पंडितांनी यथार्थदीपिकेंत यमकें साधिली आहेत म्हणून म्हटले, परंतु भागवतप्रकरणांतील वामनीश्लोकांत जशी यमर्के साधिली आहेत, तशा प्रका. रची हीही आहेत असे मात्र समजू नये. ज्ञानेश्वरीतील किंवा तुकारामनामदेवांच्या अभंगांतील. यमकांच्याच नमुन्याची ही यथार्थदीपिकेंतील यमकें आहेत. तेव्हां यथार्थदीपिकेंतील यमकांवरून म्हणजे कोणी पंडितांना ‘यमक्या वामन' हे नांव देईल, असे आमची तरी मनोदेवता घेत नाही. परंतु चमत्कार हा की, हनमंतस्वामी आपल्या रामदासी बखरीत म्हणतात, “पुढे वामनपंडित यांनी जगदोद्वारास्तव स्वामींचे आज्ञेप्रमाणे .यथार्थदीपिकादि बारा लक्ष ग्रंथ केला, त्यांतील प्रत्येक यमक अति सुंदर पाहून स्वामींनी पंडितांचें नांव 'यमक्या वामन' असें ठेविलें." यावरून हनुमंतस्वामींची पंडितांच्या ग्रंथाविषयींची कल्पना किती भ्रामक होती, हे उघड होतें.