पान:वामनपंडित.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. वामनपंडितांना सामर्थ्य आले. समग्र यथार्थदीपिकेंत या व्यतिरिक्त अन्य गुरूचा किंवा गुरुपरंपरेचा पंडितांनी कोठेही निर्देश केला नाही, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. हीच गोष्ट पंडितांनी आपल्या निरनिराळ्या चारपांच ग्रंथांत नमूद केली आहे, व तीत असंबद्धता कोठेच आढळत नाही. तेव्हां या प्रकाराशी विसंवादी असणाऱ्या सर्व दंतकथा एक तर बनावट मानिल्या पाहिजेत, किंवा त्या यथार्थदीपिकारांविषयी नसून, त्यांचा संबंध दुसऱ्या कोणत्या तरी वामनकवीशी मानला पाहिजे; यावांचून सुटका नाही. । यथार्थदीपिकेची भाषा सर्वत्र अगदी प्रयोगशुद्ध, सरळ, जोरदार व कसलेली आहे. समयानुरूप ती रसाळ, कोमळ, सणसणीत, रंगेल, भाविक व हृदयंगम अशी दिसून येते. हा ग्रंथ तयार झाल्याला आजमितीस जरी अडीचशेहून अधिक वर्षे झाली आहेत, तरी भाषारचनेंत कोठेही जुनाटपणा, अपरिचितपणा किंवा शिथिलत्व आढळत नाही. विषयप्रतिपादनाच्या आवेशांत सरस्वतीचा प्रवाह अस्खलित घोंघावत चाललेला आहे, त्याला जबरीने कृत्रिम वळण. दिलेले कोठेही भासत नाही. वाक्यरचना इतकी सरळ व बिनघोंटाळ्याची आहे की, ती बहतेक गद्यासारखाच भासते; किंबहुना गद्यग्रंथ लिहिण्याचा जर पंडितांच्या वेळी प्रघात असता, तर हजार हिश्यांनी त्यांनी आपली दीपिका गद्यरूपानेच प्रकट केली असती, असा आमचा होरां धांवतो. टीकेला ओवी छंद स्वीकारल्यामुळे, अक्षरवृत्तांच्या शृंखलेतून सुटलेली पंडितांची वाणी स्वच्छंदरीतीने विहार करितांना पाहून ठिकठिकाणी वाचकांचे चित्त रंगून गेल्यावांचून राहत नाही. पंडितांच्या ओवीला अक्षरमात्रांचा फारसा ताळमेळ आढळत नाही. मनांतला अर्थ सरळपणे व्यक्त करावयाचा या तत्त्वावरच एकंदर सर्व रचना आहे. ओवीत यमकांचीच काय ती अटक आहे, परंतु त्यांकरितां कवीने कोठेही आटापेट केलेला दिसत नाही. सूर्यबिंब क्षितिजावर आरूढ होतां क्षणींच जशी पद्मवनें आपोआप विकसित होतात, तद्वतच पंडितांच्या मनांत विचार प्रादुर्भूत होता क्षणीच त्यांची वाणी यमकांनी .