पान:वामनपंडित.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडिते. शंडितांचा बाणा सर्वत्र आढळून येतो. प्रस्तुत ग्रंथांत त्यांनी स्वतः विषयींच्या एका गोष्टीचा मात्र तीन ठिकाणी उल्लेख केला आहे ; ती गोष्ट म्हणजे त्यांना ब्रह्मविद्यारहस्याची प्राप्ति कोणापासून व कशी झाली, ही होय. (१) जी श्री सच्चिदानंद गुरू ! । जें जें वदलास कल्पतरू । निर्गुण, सुवर्ण सगुण मेरू । तो भेटलासी यतिरूपें ।। ८ श्रीगुरुरूपं देवा! । मज भेटलासी वासुदेवा!। ते हैं रहस्य देवाधिदेवा!। बोलिलासी. ॥ ७९ तुझी वचने तुजप्रती । यालागी वोलिलो श्रीपती!। की श्रोते तुझ्याच मूर्ती । तूं विश्वरूप भगवंत ॥ ८० -अध्याय १. (२) जयजय देव गीताकार! । जयजय देव टीकाकार !! जयजय देव सर्वाकार! । वामनगुरो! वामनात्मन् ! ॥ ७ -अध्याय १६. (३) सृष्टिस्थिति प्रलयादि कार्य । ज्याच्या संकल्पमात्र, तो तूं विधीचा आर्य । तोचि तूं स्वये माझा आचार्य । ऐश्वर्य माझें अतयं, देवा!॥१५ नामें आणि रूपें । सचिदानंद स्वरूपें । मजनिमित्त रूप अरूपें । प्रकट केलें मलयपर्वतीं ॥ १६ दों मुहूर्तीची संगती, । परि अनाद्यनंत अनन्यगती। जालासी, आणि बहुतां जनांतें सद्गती । यामुखें देसी तूं विश्वतोमुख ॥१७ -अध्याय १८. वरील तीन अवतरणांवरून इतकें स्पष्ट आहे की, मलयपर्वतावर पंडितांना ईश्वरी साक्षात्कार होऊन, त्यांस अद्वैततत्त्व व सगुणभक्तिरहस्य यांचा बोध झाला व त्यांनी त्या ज्ञानप्राप्तीचा उपयोग यथार्थदीपिकादि ग्रं.) थांच्या द्वारे आपल्या बांधवांना करून दिला आहे. पंडितांपुढे भगवंत यतिरूपाने प्रकट झाले. या यतीचे रूपाप्रमाणे नामही सच्चिदानंदच होते." या यतीश्वरांनी अवघ्या दोन मुहूर्ताच्या अवधीतच ब्रह्मविद्यारहस्याचा उलगडा केला व या ज्ञानप्रकाशानेच गीतेवर यथार्थ व्याख्या करण्याचे ।