पान:वामनपंडित.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. रीतीने बाह्य व खतंत्र साधनांचा मार्गच खुंटल्यामुळे, पंडितांविषयी त्यांच्या ग्रंथांतच अंतःप्रमाणाने जी काय माहिती मिळेल, तेवढीच जमेस धरून गुजारा केला पाहिजे. तसेंच पंडितांनी दिलेल्या स्वतःच्या माहितीशी जेथे जेथें म्हणून वर निर्दिष्ट केलेल्या दंतकथांचा विरोध येईल, तेथे तेथे त्या दंतकथा टाकाऊ ठरविल्या पाहिजेत, हेही अगदी उघड आहे. ३. आता आम्ही वामनपंडित म्हणजे यथार्थदीपिकाकार समजतो. यथार्थदीपिका ही भगवद्गीतेवर विस्तृत टीका आहे. हा एकंदर २२ हजारांवर ग्रंथ आहे, म्हणजे हा ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेच्या अडीच पटींहूनही जरासा मोठाच आहे. गीतेमध्ये नानात-हेचे शेकडो आध्यात्मिक व व्यावहारिक विषय आले असल्यामुळे, तीवरील या पंडितकृत विस्तृत टीकेंत पंडितांची मते, मनोरचना, लेखनशैली, थोडेबहुत जीवनवृत्त व तत्कालीन समाजस्थिति ही समजण्याचा बराच संभव आहे. शिवाय ज्याअर्थी वामनपंडित म्हणजे आम्ही यथार्थदीपिकाकार समजतो, त्याअर्थी हीच कृति प्रथम जमेस धरून, तीवरून पंडितांची अशी निःसंदेह दुसरी किती व कोणती प्रकरणे ठरतात, हे पहावयाचे आहे. तरी या कृतीचीच प्रथम छाणणी करणे इष्ट आहे. ४. पंडितांचे कुलवृत्त व इतिवृत्त जाणण्याच्या उद्देशाने हा अवाढव्य ग्रंथ चाळणाऱ्या जिज्ञासूची पूर्ण निराशा झाल्याशिवाय राहणार नाही; कारण आपले कुल, कुलदैवत, मातापितरें, जन्मस्थान, अध्ययन इत्यादिकांचा पंडितांनी कोठेही यत्किचित्सुद्धां थांगपत्ता लागू दिला नाही. त्यांनी आपला स्वतःचा उल्लेख, अथपासून इतीपर्यंत वामन' याच साध्या एकेरी नांवाने केलेला आहे. ज्याअर्थी यथार्थदीपिकेसारख्या बिनमोल महत्वाच्या अचाट ग्रंथांतही पंडितांनी आपल्या कुलवृत्ताचा वगैरे निर्देश केलेला नाही, त्याअर्थी या गोष्टींचा दांडोरा पिटणे पंडितांना मुळीच आवडत नव्हते, असे म्हणण्यास काही प्रत्यवाय आहे, असे वाटत नाही. ग्रंथकाने विषयप्रतिपादनाला अवश्य असेल, तितक्याच स्वतःच्या व्यक्तिविषयक अनुभवाचा उल्लेख करावयाचा, या पलीकडे आपली कुळकथा सांगण्यांत कांहीं हशील नाही, असाच जणुं काय