पान:वामनपंडित.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. तांना, संत किंवा त्यांचे चरित्रकार यांच्या निःपक्षपातित्व संवंधे किंवा सत्यप्रियतेसंबंधे साशंक होऊन, त्यांजवर मत्सरोपणाचा व वस्तुविपर्यासाचा आरोप लादणे विचारास धरून नाही, असे आम्हांस वाटते. महीपतिबोवांनी पंडितांचे चरित्र न लिहिण्याचे कारण इतकेंच की, त्यांना पंडितांच्या जीवनवृत्ताची माहिती वृद्धमुखाने किंवा ग्रंथद्वारा फारशी उपलब्ध झाली नसावी, किंवा जी काही उपलब्ध झाली असेल ती विशेष अलौकिक किंवा मनोरंजक वाटली नसावी. बाळाजी आणि कंपनीतील वामनचरित्रकार तर पंडितांचे निःसीम भक्त दिसतात! मग, त्यांनीही पंडितांच्या देशकुलवृत्ताविषयी व जीवनवृत्ताविषयी फारशी माहिती कां दिली नाही? त्यांना तर मत्सराने झपाटले नव्हतें ना? मग हा प्रभाव कसला? तेही अनुमानधक्याने चांचपडत चांचपडतच कां मार्ग क्रमीत आहेत ? कोणाचेही चरित्र लिहावयाचे म्हणजे त्यास यथास्थित साधने व भरपूर माहितीचा संचय लागतो; पण याच गोष्टींचा जर अभाव असेल, तर चरित्रकार काय रडणार? त्याने चरित्र कोठून पैदा करावें? हीच स्थिति महीपतिबोवादि संतचरित्रकारांची असल्यामुळे, पंडितांचे चरित्र न लिहिल्याबद्दल त्यांस दोष देणे किंवा मत्सरी म्हणणे म्हणजे निव्वळ आपल्या मनाच्या अनुदारतेचे भर चव्हाट्यावर प्रदर्शन करणे होय. आतां पंडितांचे चरित्र न लिहिल्याबद्दल जर संतचरित्रकार मतलबी व मत्सरी ठरतात, तर पंडितांच्या पादुका संभाळून ठेवणारे शिष्य व त्यांचे काशीतील वंशज यांनीही पंडितांचे चरित्र लिहिले नसल्यामुळे, तेही कृतघ्नत्वाच्या व गुरुद्रोहाच्या दोषाला पात्र होत नाहीत का ? मग, त्या शिष्यांविषयी व वंशजांविषयी एक अवाक्षरही न काढितां बाळाजी आणि कंपनीतील चरित्रकारांनी संतचरित्रकारांवरच तेवढे कां घसरावें, हे आम्हांस समजत नाही. असो, एकंदरीत पंडितांचे कुलवृत्त व जीवनवृत्त समजण्याला चांगलेंसें व विश्वासार्ह असें साधन नाही. नाही म्हणायला, संतविजयांत एक व हनुमंतस्वामीकृत रामदासी बखरीत दोन अशा एकंदर तीन आख्यायिका त्यांविषयी उपलब्ध आहेत. परंतु त्यांवर कितपत विश्वास ठेवावा व त्यांस कितीसें महत्व द्यावे याचा विचार पुढे करण्यांत येईल. अशा