पान:वामनपंडित.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. रखा मत्सराचा व क्षुद्रबुद्धीचा भयंकर आरोप संतमंडळ व त्यांचे अनुयायी यांजवर लादण्याचे धाष्टर्य करवले. कारण हा आरोप सपशेल खोटा आहे, हे ठरविण्यास हल्ली विपुल साधने उपलब्ध आहेत. 'महाराष्ट्रकवि' व 'ग्रंथमाला' या मासिकांतून अलीकडे प्रसिद्ध झालेल्या संतमालिकांपैकी बऱ्याच मालिकांत 'वामन' हे नांव आढळते. मोरोपंतांनी 'सन्मणिमाला' व 'सन्नामगर्भरामायण' यांत वामनपंडितांचा उल्लेख केला आहे ; शिवाय 'वामनपंडितस्तुति' या मथळ्याचे एक खतंत्र प्रकरण रचिले आहे. यांत पंतांनी पंडितांची जशी कवित्वाबद्दल तशीच भगवद्भक्तीबद्दलही मनःपूर्वक स्तुति केली आहे. याच प्रकरणांतील तीन गीति या निबंधाच्या आरंभीच्या अवतरणांत उतरल्या आहेत. श्रीधरांनीही पंडितांचा कवित्वासंबंधे असा सादर निर्देश केलेला आढळतो. "जैसा चंडाशु सतेज व्योमी । तैसाचि केवळ वामनस्वामी; । ज्याची श्लोकरचना ये भूमी । भूमंडळावरी अपूर्व गा!"॥ संतचरित्रकार महीपतिबोवा यांनी पंडितांचें जरी स्वतंत्र जीवनवृत्त दिले नाही, तरी मधून मधून रामदास, तुकाराम इत्यादिकांच्या हकीतीत ओघानेच पंडितांच्या नांवाचा उल्लेख मोठ्या प्रेमाने, उल्हासाने व पूज्यभावाने केलेला आढळतो.“वामनस्वामी चतुरपंडित । जो प्रेमळ द्वेषरहित । यांणी दशमस्कंध भागवत । केलें प्राकृत निजबुद्धि ॥ सं.वि.अ.१०ओ.१६ वामनस्वामी चतुरपंडित । जो वेदांतशास्त्रीं निपुण बहुत । त्याहीवरी प्रेमळ भक्त । कविता प्रख्यात जयाची ॥१०-७२ वामनस्वामी भक्त थोर । जो व्यास अवतार कलियुगी" ॥ २२-४१ हे बोवांचे उद्गार पूज्यभाव, सरलता व निर्मत्सरता यांनी रसरसलेले नाहीत का? तेव्हां अशी *प्रमाणवचनें ढळढळीत नजरेपुढे अस

  • पंडितांना साधु, संत, योगी बराच मान देत व त्यांच्याच सांगण्यावरून यथार्थदीपिका रचण्याचे त्यांचे मनांत आले, असें पंडित स्वतःच सांगतातःआणि तुझ्या कृपेचे विभागी। शिष्य, संत, भक्त, योगी, । ते म्हणती की 'जगदुपयोगी । ऐशी टीका करावी' । अ० १ ओ० १३२.