पान:वामनपंडित.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपांडत. परंतु पंडितांसंबंधमात्र यांत काहीच माहिती मिळत नाही. वामनपंडित ) हे जाडे विद्वान् , न्यायतर्कव्याकरणशास्त्रपारंगत, वेदांतविद्यानिष्णात व एकानिष्ठ सगुणोपासक होते. लोकांना वैदिक धर्मज्ञान होऊन भक्तिमार्ग वाढावा व नाममहिम्याचे खरे स्वरूप सर्वांच्या निदर्शनास यावे, म्हणून या पंडितवयांनी मराठीत दांडगी ग्रंथरचना केली. पंडितांच्या शिष्यमडळीने त्यांच्या पादुका अद्यापि सांभाळून ठेविल्या आहेत व त्यांची ते पूजा करीत असतात, असे आपल्या ऐकण्यांत असल्याचें *नवनीतकार सांगतात. तेव्हां कोणा शिष्याने किंवा महीपतिबोवांनी पंडितांचे जीवनवृत्त वर्णिलें नाही, हे आश्चर्य खरेंच! पण ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादि संतांच्या अद्भुतलीला, पंडितांसारख्या ग्रंथव्यासंगी व ज्ञाननिष्ट भगवद्भक्ताच्या जीवनवृत्तांत संभवनीय नाहीत, हेच या चरित्राभावाचे कारण असावें. कांही अलौकिक व अद्भत पाहण्यांत किंवा ऐकण्यांत आले, तर ते कागदावर टिपून ठेवण्याकडे मनुष्याची साहजिक प्रवृत्ती होते. परंतु तसे या महापंडितांच्या चरित्रांत कांही असण्याचा संभव नसल्यामुळे, त्यांचे चरित्र न लिहिण्यांत म्हणजे कोणाला दुष्टावा साधावयाचा होता, असे आमच्या बुद्धीस वाटत नाही. परंतु बाळाजी आणि कंपनीच्या वामनी ग्रंथाला जे लहानसे पंडितांचे चरित्र जोडले आहे, ते लिहिणारांची कल्पना अगदी भिन्न आहे. ते चरित्रकार वरील गोष्टीस उद्देशून लिहितात:--"ते ( पंडित ) प्रेमळ जीवन्मुक्त हरिभक्त) होते, परंतु त्यांचे हातून एकही अद्भुत चमत्कार झाला नाही, म्हणूनच जर त्यांला साधुमालिकेत विलें नसेल तर कोण जाणे! किंवा ते सत्यप्रिय व निस्पृह असल्याकारणाने त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवरील टीका करते वेळी कित्येक शब्दांचा अर्थ अन्य टीकाकारांस समजला नाही, असे स्पष्ट सांगितल्याबद्दल इतर टीकाकारांच्या अनुयायांचा त्यांवर रोष झाला असावा, व ते संतमालेत ओंवण्याजोगे साधु नव्हत, यास्तव त्यांस त्या चरित्रांच्या हद्दपार करावे, असे त्यांनी मनांत आणिले असावें." बाळाजी आणि कंपनीतील चरित्रकार पंडितांचे विशेष पक्षपाती असल्यामुळे व रागाला वश होऊन बुद्धी भडकल्यामुळेच त्यांच्याने वरच्यासा

  • नवनीत, पृष्ठ. ८८.