पान:वाटचाल (Vatchal).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मार्क्सवादी गुरू-भालचंद्रमहाराज कहाळेकर


माझे विद्यागुरू भालचंद्र शंकर कहाळेकर वयाच्या ५८ व्या वर्षी आकस्मिकपणे २८ मे १९७५ ला वारले. वाचकांच्यासाठी त्यांच्यासंबंधी मी काही लिहू इच्छितो. कै. कहाळेकरांना मराठवाड्यात त्यांचा विद्यार्थीवर्ग 'महाराज' ह्या नावाने ओळखीत असे. महाराजांनी जवळजवळ काहीच लिहिलेले नाही. इतस्ततः तुरळकपणे विखुरलेले त्यांचे स्फुटलेख आणि टिपणे संख्येने फार थोडी आहेत. औपचारिक लिखाणच त्यातून आहे. त्यामुळे महाराष्ट्राने केवढा मोठा प्रकांड पंडित आणि पूरोगामी विचारधारेचा पुरस्कर्ता गमावलेला आहे ह्याचे भान होणे कठीणच आहे. अशा वेळी आम्ही जे त्यांचे शिष्य आणि विद्यार्थी ह्यांनी काही लिहिणे आव-

श्यक आहे. त्यांच्या एकूण व्यासंगाचा व्याप आणि खोली आम्ही सांगू शकू असे नाही. पण निदान ह्या माणसाची काही ओळख तर त्यामुळे होईल. आता याहून अधिक काही करणे शक्य नाही.
कै. महाराज हे परंपरेने नांदेड जिल्ह्यातील कहाळा ह्या गावचे रहिवासी. शाक्तांच्या गाणपत्य सौर ह्या परंपरेतील व समत मठाचे अनुयायी. पण त्यांचे वडील शंकरमहाराज कहाळेकर परभणीला स्थायिक झाले. शंकरमहाराज हे संस्कृतचे पंडित, आयुर्वेदाचे तज्ज्ञ व सनातनी मतांचे होते, ते अग्निहोत्री होते. भालचंद्रमहाराज हे त्यांचे सर्वात वडील पुत्र. भालचंद्र महाराज आधुनिक विद्याविभूषित म्हणजे M. A., LL. B. होते. मराठी,