पान:वाटचाल (Vatchal).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी आस्तिक का नाही


" मी ज्या घरात जन्माला आलो ते घर आस्तिकच आहे. माझे मामा आस्तिक, माझ्या भोवतालचे सर्व वातावरणच आस्तिक आहे. जन्मल्याबरोबर मी देखील आई, बाबा, आत्या, मावशी असेच शब्द शिकलो. मी काही असे एकदम म्हणालो नाही की, "या जगात ईश्वर नाही." माझ्या नास्तिक्याचा उदय मी जेव्हा विचार करू लागलो त्यावेळेस झालेला आहे. मी नास्तिक असलो तरी सामान्यपणे मी आस्तिकाच्या भावना दुखवीत नाही. जी वस्तू अस्तित्वातच नाही तिच्याविरुद्ध झगडण्यात मला स्वारस्य नाही. एखाद्या माणसाने जर सांगितले की, 'देव आहे' तर त्यामुळे माझे काही नुकसान होत नाही. त्यालाही इतकी बुद्धी असायला पाहिजे की 'देव

नाही' म्हटल्याने त्याचेही काही नुकसान होत नाही. पण हे त्याच्या लक्षात येत नाही. 'देव आहे' म्हटल्याने माझे काही नुकसान होत नाही.
"मी देवळात जातो, देवाच्या पाया पडतो, सर्व धार्मिक समारभांना हजर राहतो, धर्मगुरूंच्या पाया पडतो, माझ्या घरी होता होईतो धार्मिक समारंभ करीत नाही. जर बायको करायचेच म्हणाली तर करतो. कुठल्याही प्रकारे अभिनिवेश नावाची जी गोष्ट आहे ती नाही. आता माझ्यावर ही जबाबदारीच आहे की, देव नाही हा मुद्दा असल्याने सर्व धार्मिक माणसांच्या भावना आपण दुखावल्याच पाहिजेत असे मी मानत नाही. माझे असे मत आहे की या जगात ईश्वर नाही व हे मत मी

वा...५