पान:वाटचाल (Vatchal).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६८ : वाटचाल

निर्माण होणे, हे ज्या व्यवस्थेत घडते ती व्यवस्था वाईट व कुमारी-मातांचा प्रश्न ज्या व्यवस्थेत निर्माण होतो, ती चांगली हे जोपर्यंत आपण सिद्ध करू शकत नाही तोवर आगरकरांच्या भूमिकेला सुधारणा म्हणणे कठीण आहे. कारण सुधारणा हा चांगल्या दिशेने घडणारा बदल असतो."
 माझ्या समोर एक उत्तरपक्ष आहे, पण तो आगरकरांच्या चाहत्यांना पटेल की नाही कोण जाणे. मी विधवांच्या संततीचा प्रश्न निर्माण करणाऱ्या समाजव्यवस्थेपेक्षा कुमारी-मातांचा प्रश्न निर्माण करणारी व्यवस्था अधिक चांगली मानतो.