पान:वाटचाल (Vatchal).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पूर्वपक्ष-उत्तरपक्ष


माझ्यासारख्या माणसाला व्याख्यानांची कितीतरी आमंत्रणे येत असतात, हे तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. पण त्याबाबतच्या गमतीदार आठवणीच तुम्हांला हव्या आहेत. कोणत्या व्याख्यानात माझी फजिती कशी झाली ह्याची वर्णने 'अ' ने करावीत आणि 'ब' ने ती चघळून सांगावीत आणि सर्व सज्जनांनी मनमोकळेपणाने हसावे, ह्यावर तुमचे समाधान दिसत नाही. इतरांच्या व्याख्यानांविषयी मी काही गमतीदार बोलून वाचकांना हसवावे अगर ह्या निमित्ताने काही चावे काढावेत असेही तुम्हाला वाटत नाही. मीच माझ्या फजितीचा अधिकृत वृत्तांत सादर करावा अशी तुमची इच्छा आहे. हे तुमचे कृत्य शिष्टाचारास सोडून आहे. कोणत्याही लेखकाला

स्वतःचे गाजलेले प्रसंग आणि इतरेजनांची फजिती यांवर लिहिण्यास सांगावयाचे असते. तुम्ही ज्या विषयावर लिहिण्यास सांगता त्याबाबत संपूर्ण सत्य सांगणे फार कठीण असते.
जे गाजलेले वक्ते असतात, मान्यवर असतात, त्यांच्या साठी असा एखादा फजितीचा प्रसंग गमतीदार असतो. मिठाप्रमाणे चव वाढविणारा असतो. कोणती ना कोणती तरी फजिती झाल्या शिवाय ज्याची सभा क्वचितच रिकामी जाते त्यांनी काय काय म्हणून सांगावे ! माझे एक मित्र आहेत. स्वतःचे नाव समजल्यास श्रोते बिचकतात हे त्यांना स्वानुभवाने इतके पूर्णपणे समजलेले आहे की, ते सभाचालकांना सांगतात- "माझे नक्की नाही, मी प्रयत्न करतो, माझे नाव