पान:वाटचाल (Vatchal).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मामा : रामचंद्रराव नांदापूरकर


' सीताराम' हे, माझ्या मामी सीताबाई नांदापूरकर यांनी छोटेसे आत्मवृत्त लिहिलेले आहे. माझे मधले मामा रामचंद्रराव यांच्या निधनानंतर सीतामामींनी विरंगुळा म्हणून हे लिखाण केले आहे. पती, जावई आणि मुलगी असे एकापाठोपाठ एक दुःखाचे आघात त्यांच्यावर कोसळले असूनसुद्धा त्यांनी मोठ्या जिद्दीने व चिकाटीने हे आत्मवृत्त पूर्ण केले. माझ्या अगदी थोरल्या मामी यांना लिहिता वाचता येत नव्हते. रुपयाचे सुटेही त्या मोठ्या कष्टानेच मोजीत. सीताबाई या माझ्या मधल्या मामी. त्यांचे शालेय शिक्षण असे कधी झालेच नाही. पण त्या स्वतःच्या जिद्दीने लिहायला, वाचायला शिकल्या. त्यांनी मोकळया मनाने लिहिलेली ही आत्मकथा आम्ही पुनरुक्ती गाळून

जशीच्या तशी छापली आहे. या आत्मकथेत घटनांचे क्रम थोडे मागेपुढे झाले तरी ते तसेच राहू दिलेले आहेत. पृष्ठ २३ वर निजामचा प्रधान कासीमरझवी असा उल्लेख झालेला आहे. तोही तसाच राहू दिलेला आहे. एका असामान्य बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या आणि असामान्य दिलदार मनोवृत्तीच्या पुरुषाबरोबर मोठ्या जिद्दीने व चिकाटीने संसार केलेल्या स्त्रीची ही कहाणी तिच्या शब्दांत, तिच्या समजुती नुसारच लिहिली गेली आहे. या कहाणीत असणारे अव्याज सौंदर्य उगीच काटेकोर शब्दरचना करून मी विघडवलेले नाही.
माझे आजोळ म्हणजे नांदापूर. नांदापूरचे गोविंदराव देशपांडे,ज्यांना सर्वजण रावसाहेब म्हणत, ज्यांचा या लिखाणात 'प्रेमळ सासरे'