पान:वाटचाल (Vatchal).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३४ : वाटचाल

श्रेय देण्याची चूक करू नये. कारण आज जे ढेरे म्हणून आपणासमोर ज्ञानी पंडित उभे आहेत त्यांच्या निर्मितीत व त्यांना उभे ठेवण्यात डॉक्टरीणबाईंचा वाटा फार मोठा आहे. न्याय म्हणून सौ. ढेरे यांचे श्रेय त्यांचे त्यांना दिले पाहिजे. नाही तर विनयगुणाचा फायदा घेऊन ढेरे गप्प बसणार व हे सर्व श्रेय त्यांचे मानणार हे बरोबर नाही. सौ. ढेरे यांनी हा माणूस सांभाळून मराठी संशोधनाची फार मोठी सेवा केली आहे. खरे आभार त्यांचे मानायला हवेत.