पान:वाटचाल (Vatchal).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डॉ. रा. चिं. ढरे : १३३

नाही, यावर संशोधकांचे मूल्यमापन होत नसते. कोणत्याही मोठ्या संशोधकाचे मूल्यमापन करताना त्याने स्वीकारलेल्या दिशांचे महत्त्व, त्या दिशांचे अचूकपण लक्षात घेऊन मूल्यमापन करावे लागते. माझ्या मते ढेरे हे असे दिशा स्थापित करणारे ज्येष्ठ नेते आहेत. त्या दिशांच्या महत्त्वावर ढेरे यांचे मोठेपण उद्या शिल्लक राहील.
 मला या दृष्टीने विचार करताना असे वाटते की, ढेरे यांची अभ्यासपद्धती तीन दिशा स्थापन करीत जात आहे. या तीनही दिशा वाङमयेतिहासाच्या व सांस्कृतिक अभ्यासाच्या क्षेत्रांत अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत. प्रथम म्हणजे वाङ्मयीन दृष्ट्या अगर धर्म-संप्रदायदृष्टया जी माणसे नेतृत्वपदी आहेत अगर मोठी आहेत, त्यांनी न नोंदविलेली माहिती दुय्यम-तिय्यम दर्जाच्या लेखकांच्या लिखाणात नोंदविलेली असते व या अप्रसिद्ध लेखकांच्या लेखनाला प्रक्षेपांची बाधा फारशी झालेली नसते. यामुळे वाङ्मयीनदृष्टया सामान्य असे लिखाण सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अतिशय असामान्य महत्त्वाचे ठरते. प्राचीन मराठीतील दुय्यम-तिय्यम दर्जाच्या अप्रकाशित ग्रंथांचे महत्व साधन म्हणून प्रस्थापित करण्याची प्रक्रिया ढेरे यांच्या अभ्यासातून सतत चालू आहे. ही दिशा महत्त्वाची आहे. दुसरे म्हणजे उत्तरकालीन पुरावा सतत पूर्वकालीन गूढे उकलण्यासाठी वापरीत आहेत आणि या पुराव्याचे महत्त्व नव्याने लक्षात येत आहे. सगळयात 'चक्रपाणि ' हा प्रबंधच या पद्धतीच्या विवेचनाचा एक नमुना आहे. दुसरी बाब म्हणजे ढेरे सांस्कृतिक इतिहासातील माहिती वाङ्मयाच्या विवेचनासाठी, वाङ्मयाच्या आकलनासाठी नव्याने वापरीत आहेत. मुरारीमल्लाच्या 'बालक्रीडे' ची प्रस्तावना या दृष्टीने पाहण्याजोगी आहे. वाङ्मयाचा लोकतत्त्वीय अभ्यास, वाङमयाच्या आकलनापुरता मर्यादित न ठेवता वाङ्मयाच्या मूल्यमापनातील एक घटक म्हणून स्थापित करण्याचा हा महत्त्वाचा प्रयोग आहे. इतर संशोधकांनी रूढ केलेल्या पद्धतीचे अनुयायी म्हणून ढेरे आहेतच, पण मराठीपुरते या वर नोंदविलेल्या तीन पद्धतींचे ते प्रमुख नेतेही आहेत. ढेरे यांच्याबाबतचे हे मूल्यमापन मी विचारपूर्वक केलेले आहे. पण ते सर्वांना पटावे, असा माझा आग्रह नाही.
 ढेरे हा माझ्या प्रेमाचा, मैत्रीचा व कौतुकाचा विषय आहे. त्यांच्याविषयी एखादे छोटे पुस्तक बनू शकेल इतके तर मी नक्कीच लिहू शकेन, पण या वेळी तसे तपशिलाने लिहिण्याचा विचार नाही. अजून त्यांच्याकडून खूप खूप लिखाणाच्या अपेक्षा आहेत. आताच ढेरे : व्यक्ती आणि वाङ्मय' याबाबत लिहिण्याची मी घाई करणार नाही. पण एक नोंद केली पाहिजे- ढेरे यांना आपण गरजेपेक्षा जास्त
 वा...९