पान:वाटचाल (Vatchal).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डॉ. रा. चिं. ढेरे



माझे मित्र डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या वाङ्मय सेवेच्या गौरवासाठी त्यांचा एक गौरव ग्रंथ पुण्याहून आज प्रकाशित होत आहे. रामचंद्र ढेरे या एका सामान्य प्रूफ-करेक्टर चे रूपांतर गेल्या पंचवीस वर्षांत क्रमाक्रमाने महाराष्ट्रातील ज्येष्ठ व मान्यताप्राप्त विद्वानात झालेले आहे. ढेरे यांच्या रूपाने माझ्या पिढीतील अभ्यासकांमधून एक मानदंड निर्माण झाला आहे. याबद्दल ज्ञानावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी वाचकास आनंदच वाटेल. लौकिक दृष्टीने विचार करावयाचा तर अनेक पारितोषिके मिळवून ढेऱ्यांनी राज्य शासनाची मुद्रा आपल्या यशावर जडविली आहे. प्रथम पीएच्. डी. आणि नंतर डी. लिट. या उपाधी हस्तगत करून त्यांनी

विद्यापीठाची मान्यताही मिळविली आहे आणि सतत ग्रंथ प्रकाशनाच्या द्वारे सर्व सामान्य अभ्यासकांची मान्यताही मिळविली आहे. यू. जी. सी. च्या शिष्यवृत्तींचाही लाभ झालेला आहेच. या दृष्टीने पाहावयाचे झाले तर ढेरे आता कीर्ती व मान्यतेच्या शिखरावर आहेत.
पण याखेरीज अजून काही पाहण्याचे दृष्टिकोन असतात. त्या दृष्टीने पाहिले, तर गेल्या पंचवीस वर्षांत ढेरे यांच्यात फार काही बदल झाला आहे, असे दिसत नाही. प्रूफ-करेक्टर ढेरे आणि डॉ. ढेरे यांच्यातील साम्य माझ्या मते फार महत्त्वाचे आहे. या साम्याच्या मानाने मतभेद फार गौण स्वरूपाचे आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे ढेरे आणि मी यांची पहिली भेट नांदेड